Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 22:50 IST2025-09-04T18:33:58+5:302025-09-04T22:50:36+5:30
Happy Teachers Day 2025 Wishes in Marathi: आपले आयुष्य घडवणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता म्हणून ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन(Teachers Day 2025) साजरा केला जातो. भारतात दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन (५ सप्टेंबर) यांचा जन्मदिवस म्हणूनही १९६२ पासून शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आपणही आपल्या शिक्षकांना शुभेच्छा देऊन त्यांचे आशीर्वाद घेऊया.

Happy Teachers Day 2025 Wishes in Marathi
ज्ञानरूपी दिवा लावून, अज्ञानाचा अंधार घालवणाऱ्या गुरूंना, शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Teachers Day Messages in Marathi
शिक्षक म्हणजे ज्ञानाचा झरा, शिस्तीचा धडा आणि प्रेरणेचा स्रोत…अशा शिक्षकांच्या शुभेच्छा पाठीशी कायम असोत...

Happy Teachers Day Status in Marathi
तुमच्या शिकवणीमुळे आमचं जीवन सुंदर झालं, स्वप्नं पाहायला आणि ती पूर्ण करायला शिकवलं. शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!"

Happy Teachers Day Shubhechha Marathi
तुमच्या एका शब्दाने आयुष्य बदलतं, तुमच्या एका शिकवणुकीने जगण्याला अर्थ मिळतो. अशा अद्वितीय गुरूंना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!"

Happy Teachers Day 2025 Quotes in Marathi
विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांना,शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Happy Teachers Day 2025 Greetings in Marathi
तुमच्या प्रत्येक शब्दाने आमचं जीवन समृद्ध केलं, तुमच्या मोलाच्या योगदानामुळे अनेकांचं जीवन सावरलं! शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!

















