शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात प्रोटीनचा स्वस्तात मस्त खजिना, 'हे' पदार्थ प्या- प्राेटीन्सची कमतरता चटकन भरून निघेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2026 09:40 IST

1 / 7
बहुतांश लोकांच्या शरीरात प्रोटीन्सची कमतरता असते. ती भरून काढण्यासाठी मग बाजारात विकत मिळणारे प्रोटीन शेक प्यायले जातात.
2 / 7
पण खरंतर उन्हाळ्याच्या दिवसांत आपण असे काही पदार्थ नियमितपणे पिऊ शकते जेणेकरून शरीरातली प्रोटीन्सची कमतरताही भरून निघेल आणि शिवाय उन्हाळ्यात शरीर थंड राहण्यासही मदत होईल.
3 / 7
यापैकी एक म्हणजे सातूचे पीठ. सातूच्या पिठामध्ये हरबरा डाळ असते. त्यामुळे त्यातून चांगल्या प्रमाणात प्रोटीन्स मिळतात.
4 / 7
मठ्ठा किंवा ताक उन्हाळ्यात दुपारच्यावेळी आवर्जून प्यायला हवे. कारण त्यामुळे शरीर थंड राहण्यास तर मदत होतेच, पण काही प्रमाणात प्रोटीनही मिळतात.
5 / 7
उन्हाळ्यात दह्यापासून वेगवेगळ्या फ्लेवरच्या लस्सी केल्या जातात. त्यातून दही आणि दूध हे दोन्ही प्रोटीनयुक्त पदार्थ मिळतात.
6 / 7
उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळण्यासाठी कित्येक जण गारेगार बदाम शेक पितात. बदाम आणि दूध हे दोन्हीही प्रोटीन्सचे चांगले स्त्रोत आहेत.
7 / 7
सोयाबीन हा प्रोटीनचा एक चांगला स्त्रोत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात अधूनमधून थंडगार सोया मिल्क प्यायला हरकत नाही.
टॅग्स :foodअन्नSummer Specialसमर स्पेशलHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स