Summer Special: सुटीत प्रवासाला निघताय? तुमच्याकडे असायलाच हवेत १० स्मार्ट ट्रॅव्हल ड्रेसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2022 17:11 IST2022-05-03T17:00:56+5:302022-05-03T17:11:27+5:30

१. समर व्हॅकेशन एन्जॉय करायला जाणार असाल तर कपड्यांची खरेदी करण्यापुर्वी या ट्रेण्डी समर ट्रॅव्हलिंग आऊटफिट्सवर एक नजर टाकाच...
२. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी अशी एखादी स्टायलिश हॅट आणि मस्त गॉगल सोबत हवाच.. आधी ते घ्या आणि मगच पुढच्या तयारीला लागा..
३. गर्मीचा चिकचिकाट टाळण्यासाठी अशा पद्धतीचे टॉप आणि शॉर्ट्स यांचाही विचार करू शकता.
४. जास्त शॉर्ट आणि स्ट्रेपी टॉप नको असतील तर अशा पद्धतीचे टॉपही खुलून दिसतात.
५. उन्हाळ्यात प्रवास करणार असाल तर अशा पद्धतीचा एखादा वनपीसही सोबत ठेवायला हरकत नाही. वनपीस कॉटनचा असेल तर तो अधिकच आरामदायी ठरतो.
६. स्कर्ट आणि टॉप हे देखील उन्हाळी सुटीसाठी आरामदायी आऊटफिट्स असू शकतात.
७. खूप शॉर्ट स्कर्ट नको असेल तर अशा पद्धतीचे स्कर्टही तुम्ही निवडू शकता.
८. जंपसूट या प्रकारची सध्या खूपच क्रेझ आहे. पण उन्हाळ्यात फिरायला जात आहात म्हटल्यावर असा जीन्सचा जंपसूट घेणे टाळा. यापेक्षा कॉटन किंवा सिंथेटिक जंपसूट अधिक आरामदायी वाटेल.
९. अशा प्रकारच्या बॅगी पॅण्टची देखील सध्या खूपच क्रेझ आहे. पायघोळ असल्या तरी मोकळ्या- ढाकळ्या असल्याने उन्हाळ्यात त्या अतिशय आरामदायी वाटतात.
१०. व्हॅकेशन एन्जाॅय करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीच्या शॉर्ट वनपीसचा देखील विचार करू शकता.