उन्हाळ्यात घालण्यासाठी फक्त ५०० रुपयांत कॉटर्न शर्ट, पाहा १० साधे सुंदर ट्रेंडी शर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 18:06 IST2026-03-11T15:49:07+5:302026-03-12T18:06:21+5:30
Summer Special Cotton Shirts :

उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला गारवा आणि आराम मिळावा यासाठी कॉटनचे शर्ट्स हा सर्वोत्तम पर्याय आहे. कॉटनचे कपडे नैसर्गिक असल्यामुळे ते घाम लवकर शोषून घेतात आणि त्वचेला खाज किंवा रॅशेस येण्यापासून वाचवतात. (Summer Special Cotton Shirts)

या कापडातून हवा खेळती राहत असल्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते. (Cotton Shirts Under 500)

पांढरा, आकाशी, फिकट गुलाबी किंवा क्रिम यांसारख्या फिकट रांगाचे शर्ट्स निवडावेत कारण ते उष्णता शोषून घेत नाहीत.

उन्हाळ्यात खूपच घट्ट शर्ट्सऐवजी थोडे सैल किंवा रेग्युलर फीट शर्ट्स जास्त आरामदायी ठरतात.

प्युअर कॉटन किंवा लिनन कॉटन ब्लेंड असलेले शर्ट्स दीर्घकाळ शरीर ताजंतवानं ठेवतात.

ऑफिससाठी तुम्ही साधे फॉर्मल कॉटर्नचे शर्ट्स वापरू शकता. तर फिरण्यासाठी हाफ स्लिव्हज असलेले प्रिंटेड कॉटन शर्ट्स सध्या ट्रेंडी आहेत.

कॉटनच्या शर्ट्सना नेहमी कडक इस्त्री लागते. त्यावर पाणी शिंपडून मग इस्त्री फिरवल्यास त्यावरच्या सुरकुत्या सहज निघून जातात.

कॉटनचे शर्ट्स धुवायला सोपे असतात पण त्यांना इस्त्री केल्यावर ते अधिकच उठावदार आणि नीटनेटके दिसतात.

सध्या उन्हाळ्यात फुलांच्या किंवा पानांच्या छोट्या प्रिंट्स असलेले शर्ट्स खूपच ट्रेंडी आहे. हे सुट्टीत किंवा पिकनीकला जाताना छान दिसतात.

उभे पट्टे असलेले कॉटन शर्ट्स तुम्हाला दिसायला उंच आणि स्लिम भासवतात तसंच फॉर्मल कामांसाठीही योग्य ठरतात

















