लग्नसराईसाठी घ्या स्टोन वर्क नेकलेस- ७ सुंदर प्रकार- चमचमत्या दागिन्याने उजळून निघेल सौंदर्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2025 19:22 IST2025-03-08T17:49:52+5:302025-11-03T19:22:56+5:30

लग्नसराईमध्ये आपण भरजरी साड्या, भरजरी कपडे घालतो.. त्यावर स्टोनचे चमचमते दागिने खूपच शोभून दिसतात...

त्यामुळेच जर तुम्हाला लग्नसराईनिमित्त स्टोनवर्क केलेल्या दागिन्यांची खरेदी करायची असेल तर हे काही पर्याय पाहून घ्या..

हे दागिने खूप छान दिसतात शिवाय ते खूप महागडेही नसतात. अगदी ५०० रुपयांपासून ते मिळतात.

रिसेप्शनसारख्या कार्यक्रमांमध्ये आणि डिझायनर वेअर साड्यांवर स्टोनचे दागिने अधिक चांगला लूक देतात..

हल्ली लग्नसराईदरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये घागरा, लेहेंगा घातले जातात. त्यावर स्टोन वर्क, थ्रेड वर्क असतंच.. अशा कपड्यांवर स्टोन वर्क नेकलेस छान दिसतात.

भरजरी हेवी दागिन्यांची आवड असेल तर ट्रॅडिशनल प्रकारातले असे काही दागिने तुम्ही घेऊ शकता..

वेस्टर्न वेअर प्रकारातले हेवी दागिने घ्यायचे असतील तर अशा पद्धतीच्या अनेक ट्रेण्डी नेकलेस डिझाईन्स स्टोन वर्क मध्ये उपलब्ध आहेत.

याशिवाय वेस्टर्न वेअर प्रकारात असे नाजूक सुंदर नेकलेससुद्धा तुम्ही ट्राय करून पाहू शकता.. हे दागिने तर साडी किंवा ड्रेसवर सुद्धा तुम्ही घालू शकता.

















