टिश्यू सिल्क कॉटन साड्यांचे खास कलेक्शन; १० सुंदर पॅटर्न्स, अंगाला चापून चोपून बसेल साडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 13:26 IST2026-03-23T12:31:13+5:302026-03-23T13:26:45+5:30
Special Collection of Tissue Silk Cotton Sarees : हे कापड नाजूक असल्यानं ड्राय क्लीन करणं केव्हाही चांगलं ठरतं. जेणेकरून त्याची चमक टिकून राहते.

टिश्यू सिल्क कॉटन साडी (Tissue silk cotton sarees) किंवा कापड हे सध्याच्या काळात अत्यंत लोकप्रिय आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत ही साडी कोणत्याही कार्यक्रमाला नेसण्यासाठी उत्तम पर्याय आहे. (Special collection of tissue silk cotton sarees)

टिश्यू सिल्क कॉटन हे रेशीम आणि सुती धाग्यांच्या मिश्रणातून तयार केले जाते. यामध्ये टिश्यू इफेक्ट देण्यासाठी अत्यंत तलम धाग्यांचा वापर होतो. (10 Beautiful Patterns to Wear in Summer)

टिश्यू सिल्कमुळे या कापडाला एक विशिष्ट प्रकारची धातूसारखी चमक येते. तर कॉटनमुळे ते वजनाला हलके आणि वापरायला सुटसुटीत असते.

टिश्यू सिल्कमुळे या कापडाला एक विशिष्ट प्रकारची धातूसारखी चमक येते. तर कॉटनमुळे ते वजनाला हलके आणि वापरायला सुटसुटीत असते.

हे कापड अतिशय हलके आणि लाईटवेट असते. त्यामुळे दिवसभर नेसण्यासाठी किंवा परिधान करण्यासाठी ते अतिशय सोयीस्कर ठरते.

टिश्यू सिल्क कॉटन थोडं पारदर्शक आणि तलम असते. ज्यामुळे त्याला एक रॉटल आणि एलिट लूक मिळतो.

कॉटनच्या अंशामुळे हे कापड उन्हाळ्यातही अंगाला टोचत नाही आणि घाम शोधून घेण्यास मदत करते.

हे कापड पेस्टल शेड्सपासून ते गडद रंगांपर्यंत सर्व छटांमध्ये उपलब्ध असते. विशेषत: सोनेरी आणि चंदेरी रंगाची झाक यात उठून दिसते.

लग्नकार्य, सण-समारंभ किंवा औपचारीक पार्ट्यांसाठी टिश्यू सिल्क कॉटनच्या साड्यांना महिलांची पहिली पसंती असते.

हे कापड नाजूक असल्यानं ड्राय क्लीन करणं केव्हाही चांगलं ठरतं. जेणेकरून त्याची चमक टिकून राहते. सध्या या कापडाचा वापर केवळ साड्यांपुरता मर्यादीत न राहता ड्रेस मटेरियल, ओढणी आणि कुर्त्यांसाठीही मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.

















