ना दूध उतू जाण्याचे टेंन्शन, ना भाजी चिरण्याची झंझट! स्वस्त आणि मस्त टूल्स करतील गृहिणींच काम सोपं - पाहा ८ स्मार्ट किचन टूल्स...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2025 18:26 IST2025-12-31T17:57:32+5:302025-12-31T18:26:08+5:30
smart kitchen tools for home : must have smart kitchen gadgets : best kitchen tools for easy cooking : time saving kitchen tools : किचनमधील किचकट, वेळखाऊ कामे होतील फक्त मिनिटभरात, प्रत्येक गृहिणीकडे असायलाच हवीत ८ स्मार्ट किचन टूल्स...

आजच्या धावपळीच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये 'स्मार्ट वर्क' ही काळाची गरज बनली आहे. घरातील सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे किचन, जिथे गृहिणींचा स्वयंपाक करण्यात बराचसा वेळ खर्च होतो. भाजी चिरण्यापासून ते मसाले वाटण्यापर्यंतची अनेक कामे कधीकधी खूप किचकट आणि वेळखाऊ वाटू लागतात. पण विचार करा, जर हीच कामे (must have smart kitchen gadgets) चुटकीसरशी झाली तर?

स्वयंपाकघरातील तेच तेच कंटाळवाणे कष्ट कमी करण्यासाठी आणि कामाचा वेग (best kitchen tools for easy cooking) वाढवण्यासाठी बाजारात आता अशी काही 'स्मार्ट टूल्स' आणि आधुनिक भांडी उपलब्ध आहेत, जी केवळ तुमचा वेळच वाचवत नाहीत तर स्वयंपाकाचा आनंदही द्विगुणित करतात. ही साधने तुमच्या किचनमध्ये असतील, तर तासनतास चालणारी कामे काही मिनिटांत पूर्ण होतील आणि तुम्हाला स्वतःसाठी थोडा जास्तीचा वेळ मिळेल.

भाज्या चिरणे, कणीक मळणे, फोडणी देणे, वाटणं तयार करणे यांसारखी रोजची किचकट आणि वेळखाऊ कामे अनेकदा दमवून सोडतात. अशा वेळी किचनमध्ये काही स्मार्ट टूल्स आणि उपयुक्त भांडी असतील, तर हीच कामे चुटकीसरशी, सहज आणि अधिक नीटनेटकी पद्धतीने पूर्ण करता येतात. आधुनिक तंत्रज्ञान आणि स्मार्ट डिझाइनमुळे तयार केलेली ही किचन टूल्स केवळ वेळ वाचवत नाहीत, तर स्वयंपाक करताना होणारा ताणही कमी करतात.

किचनमध्ये असायलाच हव्या अशा स्मार्ट टूल्स आणि भांड्यांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांच्या मदतीने स्वयंपाकघरातील काम करणे खरोखरच सोपे आणि आनंददायी होईल.

१. रोटी कन्सूलेशन बॅग :-
पोळ्या डब्यात किंवा कॅसरोलमध्ये ठेवल्यानंतर काही वेळाने त्या खालून ओल्या होतात किंवा कडक होतात. ही आपल्या प्रत्येकाची रोजची समस्या आहे. यावर सर्वात सोपा आणि स्मार्ट उपाय म्हणजे 'रोटी कन्सूलेशन बॅग'. या बॅगमध्ये कापडाचे विशेष अस्तर असते जे बाष्प शोषून घेते, ज्यामुळे पोळ्या, पुऱ्या, पराठे बराच वेळ मऊ आणि ताज्या राहतात. ही बॅग तुमच्या किचनसाठी एक 'मस्ट हॅव' वस्तू आहे.

२. हर्ब सेवर :-
कोथिंबीर, कढीपत्ता, पुदिना दीर्घकाळ फ्रेश ठेवण्यासाठी हर्ब सेवर फायदेशीर ठरते. हर्ब सेवरची रचना अशी असते की त्यातील वनस्पतींची मुळे पाण्यात राहतात, तर पाने वरच्या बाजूला सुरक्षित राहतात. यामुळे कोथिंबीर किंवा पुदिना २ ते ३ आठवडे अगदी ताजेतवाने राहतात. हे साधन आकाराने उभे आणि स्लिम असते, ज्यामुळे फ्रीजच्या दरवाजाच्या कप्प्यातही ते सहज बसते. याच्या डिझाइनमुळे आत हवा खेळती राहते आणि जास्तीचा ओलावा पानांना खराब करत नाही. यामध्ये फक्त खालच्या भागात थोडे पाणी भरावे लागते आणि दर ३ ते ४ दिवसांनी ते पाणी बदलावे लागते.

३. फ्रेश स्ट्रेच पॉड :-
स्वयंपाक करताना बऱ्याचदा आपल्याला अर्धा कांदा, अर्धे लिंबू किंवा अर्ध्या टोमॅटोचीच गरज लागते. उरलेला भाग आपण फ्रीजमध्ये असाच ठेवतो, ज्यामुळे तो सुकतो किंवा त्याचा वास पूर्ण फ्रीजमध्ये पसरतो. या समस्येवर 'फ्रेश स्ट्रेच पॉड' हे एक अतिशय स्मार्ट आणि दिसायला आकर्षक असे टूल आहे. या पॉडच्या वरच्या बाजूला लवचिक सिलिकॉन असते, जे कापलेल्या फळाच्या किंवा भाजीच्या आकाराप्रमाणे ताणले जाते आणि त्याला घट्ट कव्हर करते. एअर-टाईट असल्यामुळे कापलेला भाग हवेच्या संपर्कात येत नाही, परिणामी भाजी किंवा फळे बरेच दिवस ताजे राहते आणि त्यातील ओलावा टिकून राहतो. कांदा किंवा लसणासारख्या उग्र वास असलेल्या गोष्टी या पॉडमध्ये ठेवल्यामुळे त्यांचा वास इतर पदार्थांना लागत नाही.

४. पोर्टेबल वॉटर ज्युसर :-
हेल्थ कॉन्शियस आसणाऱ्यांसाठी 'पोर्टेबल वॉटर ज्युसर' फायदेशीर ठरते. ज्यूस बनवण्यासाठी आता मोठ्या आणि अवजड मिक्सरची किंवा विजेच्या बोर्डाची गरज लागत नाही. हे लहान, वजनाने हलके आणि स्टायलिश गॅजेट तुमच्या बॅगेतही सहज मावते. एकदा चार्ज केले की, तुम्ही ऑफिस, जिम किंवा प्रवासात असतानाही ताज्या फळांचा ज्यूस किंवा स्मूदी बनवू शकता. फळांचे छोटे तुकडे करा, थोडे पाणी किंवा दूध घाला आणि बटण दाबा; अवघ्या काही सेकंदात तुमचा ज्यूस तयार होतो.

५. मिल्क बॉयलर :-
किचनमध्ये काम करताना सर्वात जास्त लक्ष द्यावे लागणारे काम म्हणजे 'दूध तापवणे'. जरा इकडे-तिकडे लक्ष झाले की दूध उतू जाते, या त्रासातून मुक्त होण्यासाठी 'मिल्क बॉयलर' ही अत्यंत फायदेशीर अशी वस्तू आहे. दुधाला उकळी आली की कुकरप्रमाणे यातून शिट्टीचा आवाज येतो. यामुळे दूध उतू न जाता ते व्यवस्थित गरम झाले आहे हे आपल्याला लांबूनही समजते.

६. व्हेजिटेबल पिलर :-
भाज्या सोलणे हे स्वयंपाकातील सर्वात कंटाळवाणे काम मानले जाते. जुन्या पद्धतीच्या सुरीने साल काढताना भाजीचा बराचसा भाग वाया जातो आणि वेळही जास्त लागतो. पण 'स्मार्ट पिलर्स' मुळे हे काम आता अतिशय सुटसुटीत झाले आहे. यामध्ये ब्लेडच्या मागे एक छोटा डबा जोडलेला असतो. भाजी सोलल्यावर सर्व साल थेट त्या डब्यात जमा होते, ज्यामुळे किचन ओटा खराब होत नाही.

७. व्हेजिटेबल चॉपर :-
७. व्हेजिटेबल चॉपर :- स्वयंपाकात सर्वात जास्त वेळ कशासाठी लागत असेल, तर तो म्हणजे 'भाजी चिरण्यासाठी'. कांदा कापतांना डोळ्यात येणारे पाणी असो किंवा कोबी बारीक चिरण्याची कसरत, 'व्हेजिटेबल चॉपर' या सर्व समस्यांवरचा एक जादुई उपाय आहे. कांदा, टोमॅटो, गाजर, मिरची इतकेच नाही तर सुका मेवा देखील यात अतिशय बारीक चिरू शकता. अनेक चॉपर्स हे 'पुल-स्ट्रिंग' (दोरी ओढणारे) असतात, ज्यासाठी वीज लागत नाही. तुम्ही दोरी जितक्या वेळा ओढाल, तितकी भाजी जास्त बारीक चिरली जाते.

८. सिलिकॉन स्पॅचुला :-
आजकाल प्रत्येक किचनमध्ये नॉन-स्टिक तवे किंवा कढईचा वापर होतो. पण त्यावर स्टीलचा चमचा वापरल्यास कोटिंग खराब होते. अशा वेळी 'सिलिकॉन स्पॅचुला' हा सर्वात सुरक्षित आणि सोयीस्कर पर्याय ठरतो. हे मऊ मटेरियलपासून बनवलेले असल्याने तुमच्या महागड्या भांड्यांवर ओरखडे पडत नाहीत आणि त्यांचे कोटिंग दीर्घकाळ टिकते. याची लवचिकता इतकी उत्तम असते की भांड्याच्या कोपऱ्यात चिटकलेले पीठ, बॅटर किंवा सॉस हे पूर्णपणे खरवडून काढता येते. यामुळे अन्नाची नासाडी होत नाही.

योग्य आणि उपयोगी स्मार्ट किचन टूल्स असतील, तर स्वयंपाकघरातील कामे कमी वेळात, फारशी मेहनत न घेता अधिक आनंदाने झटपट करता येतात.
















