शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

फेशियल करुनही चेहरा काळवंडलेलाच दिसतो? ५ चुका टाळा, तरच फेशियलचे पैसे होतील वसूल,चेहरा चमकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2025 18:51 IST

1 / 7
त्वचा चांगली होण्यासाठी कित्येक जणी नियमितपणे फेशियल करतात. पण तरीही फेशियल करूनही त्यांच्या चेहऱ्यावर म्हणावा तसा ग्लो येत नाही. उलट चेहरा काळवंडल्यासारखा दिसतो. असं का होतं
2 / 7
फेशियल करताना सगळ्यात आधी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की तुमच्या त्वचेचा पोत पाहून तसेच तुम्हाला कोणते प्रोडक्ट सूट होतात ते पाहूनच फेशियल करायला हवं. त्वचेला सूट होणारं फेशियल केलं की त्वचा छान चमकते.
3 / 7
ज्या लोकांच्या त्वचेला वाफ घेणं सहन होत नाही, त्यांचीही त्वचा फेशियल केल्यानंतर काळवंडते.
4 / 7
वाफ घेण्याचा वेळ ठराविक असतो. त्यामुळे जर फेशियल करताना तुम्हाला गरजेपेक्षा जास्त वेळ वाफ दिली जात असेल तर त्यामुळेही त्वचेवर परिणाम होऊन ती काळवंडू शकते.
5 / 7
फेशियल केल्यानंतर उन्हामध्ये बाहेर जाणं कटाक्षाने टाळायला हवं. त्याचा त्वचेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे फेशियल केल्यानंतर घरी आराम करा. उन्हात अजिबात फिरू नका.
6 / 7
फेशियल केल्यानंतर पार्लरमधून घरी जातानाही त्वचेला मॉईश्चरायजर तर लावाच, पण त्यासोबत सनस्क्रिन लावायलाही विसरू नका.
7 / 7
फेशियल केल्यानंतर पुढचे ८ ते १० तास गरम पाण्याने चेहरा धुवू नका. चेहरा धुवायचा असेल तर थंड पाणी वापरा.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजी