फक्त या ५ गोष्टी बदला ५ वर्षांनी दिसू लागाल तरुण, ना व्यायामाची गरज ना डाएटची-सगळे म्हणतील वॉव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2025 17:54 IST2025-11-17T14:38:58+5:302025-11-17T17:54:51+5:30

स्त्रियांना वय विचारू नये असं म्हणतात. कारण खरं वय सांगणं त्यांना अतिशय जिवावर येतं. त्याउलट तू किती तरुण वाटते आहेत, सुंदर दिसते आहेस, असं म्हटलं तर ते ऐकायला प्रत्येकीलाच आवडतं..

म्हणूनच तर आहे त्यापेक्षा कमी वयाचं दिसण्यासाठी अनेकींचे प्रयत्न सुरू असतात. त्यासाठी काही छोट्या- छोट्या गोष्टी बदलून पाहिल्या तर तुमचा लूकही पुर्णपणे बदलू शकतो आणि तुम्ही आहात त्यापेक्षा नक्कीच कमी वयाच्या दिसू शकता.

रोजच्या वापरासाठी नाजूक मंगळसूत्र घ्या. नाजूक मंगळसूत्र घातल्यास जास्त तरुण लूक मिळेल.

हल्ली फुल लेंथ प्लाझो किंवा लेगिंन्सची फॅशन नाही. तर त्याऐवजी ॲन्कल लेंथ प्लाझो किंवा लेगिंन्स ट्रेण्डमध्ये आहेत. त्यामुळे त्या नक्की ट्राय करा. स्मार्ट दिसाल.

नेहमी एकच एक प्रकारचे कुर्ते किंवा टॉप घालू नका. ट्रेण्डनुसार तुमच्याकडचं कपड्यांचं कलेक्शनही बदला.

३ महिन्यातून एकदा केस नक्की ट्रिम करा. तसेच अगदी नियमितपणे आयब्रोज करा. यामुळे तुम्ही जास्त स्मार्ट, सुंदर आणि आकर्षक दिसता.

लग्नसमारंभासाठी तयार होताना मधून भांग पाडून आंबाडा घालणे टाळा. त्याऐवजी पफ काढून आंबाडा घाला. किंवा आंबाडा पुर्णपणे टाळून केस मोकळे सोडा, मोकळे केस असणाऱ्या वेगवेगळ्या हेअरस्टाईल ट्राय करा.

नेहमीच खूप मोठी टिकली लावू नका. नाजुक टिकली तुमचं व्यक्तिमत्त्व खुलवते आणि तुम्हाला जास्त आकर्षक लूक देते.

काजळ लावण्याच्या ऐवजी आय लायनर लावा. डोळे जास्त टपोरे आणि सुंदर दिसतील.

क्लचर लावून अगदी खाली मानेवर केस बांधू नका. त्याऐवजी हाय पोनी घाला. यामुळेही तुम्ही जास्त तरुण दिसाल.