१ मिनिटांत खोबरं येईल करवंटीच्या बाहेर! कठीण वाटणारं काम हाेईल अगदी सोपं, पाहा कसं..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2025 19:57 IST2025-04-07T12:17:58+5:302025-04-07T19:57:32+5:30

करवंटीतून नारळ बाहेर काढणं हे अनेकींना महाकठीण काम वाटतं. त्यामुळेच मग कित्येक जणी नारळ आणून ओल्या नारळाचे वेगवेगळे पदार्थ करण्याचाही कंटाळा करतात.
बऱ्याचदा तर असंही होतं की करवंटीतून नारळ बाहेर काढण्यासाठी आपण चाकू, सुरी अशा टोकदार वस्तूंचा वापर करतो. त्यावेळी त्या हातात घुसून दुखापतसुद्धा होते.
म्हणूनच हे कठीण, त्रासदायक काम आता अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचं ते पाहूया..हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी तर नारळ फोडून त्याचे दोन तुकडे करून घ्या.
यानंतर ते तुकडे गॅसवर १- २ मिनिटे ठेवून चांगले गरम करून घ्या.
त्यानंतर ते एखादा मिनिट थंड पाण्यात ठेवा. त्यानंतर चमच्याने प्रयत्न करून पाहा.. अलगदपणे नारळ करवंटीपासून वेगळे होईल.