फक्त ५ मिनिटांत सोला एक किलो लसूण, पाहा भन्नाट जुगाड-हाताला कणभरही वास येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2025 15:33 IST2025-07-17T09:23:05+5:302025-07-17T15:33:05+5:30

लसूण स्वयंपाकात असेल तर पदार्थाची चव आणखी खुलून येते, हे अगदी खरं. पण लसूण सोलणं हे अनेक जणींना खूपच वेळखाऊ आणि किचकट काम वाटतं..

लसूणाची एकेक पाकळी घेऊन ती सोलत बसण्याएवढा वेळ तर वर्किंग वुमनकडे नक्कीच नसतो. शिवाय घरात कोणी मदतीलाही नसेल तर आहारातला लसणाचा वापर सर्रास टाळला जातो.

म्हणूनच आता ही एक मस्त ट्रिक पाहा आणि अगदी भराभर लसूण सोला. हा उपाय shiprarai2000 या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी लसूणाच्या पाकळ्या वेगवेगळ्या करून घ्या.

त्यानंतर त्यांना अगदी थोडं तेल लावा. तेल सगळ्या पाकळ्यांना लागेल याकडे मात्र लक्ष द्या.

यानंतर तेल लावलेल्या लसूण पाकळ्या एका नॅपकिनमध्ये गुंडाळा आणि तो नॅपकिन ओट्यावर ठेवून थोडा जोरात रगडा. अगदी एखाद्या मिनिटांतच लसूण आणि त्याची टरफलं मोकळी होऊन जातील. ट्राय करून पाहा.