कमी बजेटमध्ये घ्या चांदीच्या स्टोन अंगठ्या; रोजच्या वापरासाठी १० स्टायलिश पर्याय,सुंदर दिसेल हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 10:10 IST2025-09-04T15:56:59+5:302025-09-06T10:10:58+5:30

Silver Stone Rings Top 10 Designs : छोट्या छोट्या डिटेलिंगसह केलेले या अंगठ्या तुम्हाला सिंपल, सुंदर लूक देतील.

चांदीचे दागिने घालणं शुभ मानलं जातं. सोन्यापेक्षा चांदीचा भाव खूपच कमी असतो आणि चांदीचे दागिने दिसायलाही नाजूक, सुंदर असतात. विशेष म्हणजे कमी बजेटमध्ये आपल्याला हवेतसे बनवून घेता येऊ शकता. (Latest Silver Rings Designs In Low Budget)

चांदीच्या अंगठ्यांच्या काही सुंदर डिजाईन्स पाहूया. रोजच्या वापरासाठी घरात घालण्यासाठी,ऑफिसला जाण्यासाठी किंवा एखाद्या कार्यक्रमाला घालण्यासाठी या सुंदर डिजाईन्स आहेत.

छोट्या छोट्या डिटेलिंगसह केलेले या अंगठ्या तुम्हाला सिंपल, सुंदर लूक देतील.

जर तुम्हाला स्टोन्स आवडत नसतील तर तुम्ही प्लेन डिजाईन्सच्या रिंग्स निवडू शकता.

काहीजण राशीनुसार असलेले खडे अंगठीत घालतात तर काहीजण स्टोन असलेल्या सिल्व्हर रिंग्स घालणं पसंत करतात.

मिनिमलिस्ट नाजूक कमी वजनाच्या अंगठ्या तुम्हाला घालता येतील.असं मानलं जातं की चांदी सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि जीवनात सुख समृद्धी आणते.

या अंगठीत जडवलेल्या खड्यांच्या गुणवत्तेनुसार आणि प्रकारानुसार किंमत वाढते.

फुलांच्या डिजाईन्ससुद्धा चांदीच्या डिजाईन्समध्ये उत्तम दिसतात.

हार्ट शेपच्या डिजाईन्स किंवा पानाचे आकार तुम्हाला शोभून दिसतील.

या अंगठ्या तुम्हाला ऑनलाईन किंवा ज्वेलर्सच्या शॉपमध्ये सहज मिळतील.