By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 16:14 IST
1 / 8२६ जानेवारीला बऱ्याच ठिकाणी सत्यनारायणाची पूजा घातली जाते. पूजा म्हटलं की नैवेद्य आलाच. नैवेद्यासाठी अनेक ठिकाणी रव्याचा शिरा केला जातो. प्रसादाचा शिरा अगदी मऊ, रवाळ आणि चविष्ट होण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवायला हव्यात.2 / 8 शिरा करण्यासाठी नेहमी रवा, तेव्हढचं तूप आणि साखर पण दूध-पाणी मात्र रव्याच्या अडीच ते तीन पट असावं.3 / 8 शिऱ्यासाठी शक्यतो बारीक रवा वापरा. यामुळे शिरा तोंडात टाकताच विरघळतो आणि मऊ होतो. 4 / 8रवा भाजताना घाई करू नका. मंद आचेवर रवा गुलाबी होईपर्यंत आणि तुपाचा वास सुटेपर्यंत सतत हलवत व्यवस्थित भाजा.5 / 8 रव्यात कधीही थंड दूध किंवा पाणी घालू नका. नेहमी कडकडीत गरम दूध-पाणी घाला. त्यामुळे रवा छान फुलतो आणि शीरा चिकट होत नाही.6 / 8 प्रसादाच्या शिऱ्यात पिकलेली वेलची केळी बारीक चिरून रवा भाजतानाच घालावी. जेणेकरून ती रव्यात व्यवस्थित एकजीव होते.7 / 8 शिरा तयार झाल्यावर शेवटी वरून थोडं साजूक तूप सोडल्यानं त्याला छान चकाकी येते आणि चव वाढते.8 / 8प्रसादाचा शिरा पूर्ण झाल्यावर त्यावर तुळशीची पानं आणि वेलची पूड आवर्जून घाला यामुळे त्याला सात्विक सुगंध येतो.