सारा तेंडूलकरचा लहानपणीचा फोटो व्हायरल! छोट्या साराचा क्युटनेस दाखवणारे १० जुने फोटोज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 12:26 IST2026-03-31T11:51:10+5:302026-03-31T12:26:28+5:30
Sara Tendulkar's Childhood Photos Are going viral : आजही जेव्हा सारा तिचे बालपणीचे जुने फोटो सोशल मीडियावर शेअर करते तेव्हा ते इंटरनेटवर काही क्षणातंच व्हायरल होतात.

भारतीय क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकरची लेक सारा तेंडूलकर लहानपणापासूनच माध्यमांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु राहिली आहे. (Sara Tendulkar's Childhood Photos Are going viral)

तिचा जन्म १२ ऑक्टोबर १९९७ रोजी मुंबईत झाला. ती क्रिकेट सम्राट सचिन तेंडूलकर आणि डॉ.अंजली तेंडूलकर यांनी थोरली लेक आहे.

बालपणीच्या अनेक फोटोंमध्ये सारा तिचे वडील सचिन तेंडलूकर यांना क्रिकेटच्या मैदानावर चिअर करताना आणि प्रोत्साहन करता दिसते.

तिच्या लहानपणीच्या फोटोंमध्ये तिचे कुरळे केस आणि निरागस हास्ट चाहत्यांना विशेष आवडते.

दिग्गज खेळाडूची मुलगी असल्यामुळे सारा लहानपणापासूनच कॅमेराच्या आणि प्रसारमाध्यमांच्या गराड्यात राहीली आहे.सध्या तिचा हिरव्या साडीतील पारंपारीक वेशातील फोटो व्हायरल होतो आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये ती तिचा धाकटा भाऊ अर्जुन तेंडूलकरसोबत खेळताना आणि मस्ती करताना दिसते.

सचिन तेंडूलकरनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये सारा अनेकदा कुटुंबासोबत परदेश दौऱ्यावर किंवा सुट्ट्यांचा आनंद घेताना पाहायला मिळते.

लहानपणापासूनच साराच्या फोटोंमध्ये तिचा साधेपणा आणि मोहक फॅशन सेन्स दिसून येतो.

अनेक फोटोंमध्ये साराची झलक तिची आई अंजली तेंडूलकर यांच्यासारखीच आहे. ज्यामुळे तिला आईची कार्बन कॉपी असंही म्हटलं जातं.

सारा तेंडूलकरचे लहानपणीचे फोटोही खूपच उत्साही आहेत जे तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतील.

















