संक्रांत स्पेशल चंद्र- तारा साडी! काळ्या रंगाच्या साडीवर चंद्र- चांदण्यांचा लखलखाट, बघा ७ सुंदर प्रकार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2025 10:36 IST2025-12-27T10:28:34+5:302025-12-27T10:36:03+5:30

संक्रांतीनिमित्त काळी साडी घेणार असाल तर यंदा ट्रेंडिंग असणाऱ्या काळ्या रंगाच्या चंद्रतारा साड्यांचे हे काही सुंदर प्रकार पाहा...(sankrant special black colour chandra tara saree)

पैठणीमध्येही तुम्हाला अशी काळी चंद्रकला मिळू शकते. त्यावरचं सुरेख डिझाईन तर बघताक्षणीच उपस्थितांचं लक्ष वेधून घेतं.(chand tara black saree for makar sankranti)

प्युअर सिल्क पैठणी किंवा सेमी पैठणी मध्येही तुम्ही ही साडी घेऊ शकता. त्यात चंद्राचे असे वेगवेगळे प्रकार मिळतील..(chad tara saree shopping for makar sankranti)

इरकल साडीमध्येही अशी सुंदर साडी मिळू शकते. इरकल साड्या नेहमीच अंगावर छान दिसतात आणि अगदी चापूनचोपून बसतात.

खण साड्यांचा ट्रेण्ड अजूनही आहेच. त्यामध्येही अशी मस्त चंद्र- तारा साडी तुम्ही घेऊ शकता.

बनारसी साडी घ्यायची असेल तर त्यातही चंद्र आणि चांदण्यांचं डिझाईन असणारी अशी सुंदर साडी मिळू शकते.

डिझायनर वेअर साड्या आवडत असतील तर अशा पद्धतीची चांदण्यांची बॉर्डर असणारी साडीही तुम्ही घेऊ शकता.

सॉफ्ट सिल्क किंवा सिल्क साड्यांमध्ये अशी चंद्राची बुटी असणारी साडी मिळते. त्याला चांदबुटी साडी म्हणूनच ओळखलं जातं. अशा पद्धतीची काळी साडीही संक्रांतीच्या निमित्ताने अनेक जणी घेतात.

















