By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 16:10 IST
1 / 10प्रजासत्ताक दिनाला (Republic Day 2026) जर तुम्ही पांढरी साडी नेसणार असाल तर त्यावर पांढरं ब्लाऊज न शिवता कलरफुल ब्लाऊज शिवले किंवा नवीन न शिवता घरातल्याच एखाद्या साडीवरचं ब्लाऊज जर तुम्ही घातलं तर लूक खुलून येईल आणि तुम्ही सुंदर दिसाल. (White Saree For women 10 Sarees For Republic Day)2 / 10घरातल्या एका कोणत्याही जुन्या साडीचं ब्लाऊज तुम्हाला सुंदर लूक देईल. प्रजासत्ताक दिनासाठी तुम्हाला युनिक लूक हवा असेल तर या प्रकारचं ब्लाऊज घालू शकता. (Republic Day Saree look)3 / 10जर तुम्हाला कॉटन प्रिंटचं ब्लाऊज आवडत असेल तर तुम्ही या प्रकारचं ब्लाऊज शिवून घेऊ शकता. नंतर ते तुम्हाला काळ्या साडीवरही वापरता येईल. (10 White Sarees With Colorful Blouse)4 / 10पिवळा रंग हा रॉयल लूक देतो. जर तुम्ही पांढऱ्या साडीवर पिवळ्या रंगाचं ब्लाऊज घातलं तर सगळ्यात उठून दिसाल. जर साडीची बॉर्डर सोनेरी असेल तर आवर्जून पिवळा रंग ब्लाऊजचा असावा.5 / 10लाल किंवा मरून रंगाचं वर्क असलेलं ब्लाऊज तुम्हाली एक रॉयल लूक देईल. ज्यात तुम्ही सिंपल पण आकर्षक दिसाल.6 / 10जर साडीची किनार गुलाबी असेल किंवा प्लेन पांढरी साडी असेल तर तुम्ही त्यावर गुलाबी रंगाचं ब्लाऊज शिवू शकता.7 / 10हिरवं ब्लाऊजसुद्धा उठून दिसेल. तिरंग्यातील एक रंग म्हणून हिरव्या रंगाचं ब्लाऊज आणि पांढरी साडी असं कॉम्बिनेशन तुम्ही केलं तर कमालीचा सुंदर लूक दिसेल.8 / 10याशिवाय फुल स्लिव्हज लाल प्रिंट असलेलं ब्लाऊजसुद्धा रिच दिसेल. तुम्ही प्रजासत्ताक दिनाला बाहेर जाताना हा लूक करू शकता.9 / 10यातील सर्व रंग पांढऱ्या तसंच मोती रंगाच्या साडीवर उठून दिसतील. तुम्ही कोणत्याही प्रकारे साडी स्टायलिंग करू शकता.10 / 10जर तुम्ही साडी खादी कॉटन किंवा लिनन कॉटनची असेल तर असे अंगाला व्यवस्थित बसणारे कॉटनचे ब्लाऊज तुम्ही निवडू शकता.