१ ग्रॅम सोन्याच्या राजवाडी मंगळसूत्रांचा खास ट्रेंड; १० नवीन डिजाईन्स, साडीत उठून दिसेल मोठं मंगळसूत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 23:32 IST2025-12-10T18:23:04+5:302025-12-10T23:32:23+5:30
Rajwadi Mangalsutra : या मंगळसूत्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे भव्य आणि आकर्षक पेंडंट.

राजवाडी मंगळसूत्रातील राजवाडी हा शब्द शाही किंवा राजघराण्यांशी संबंधित आहे. या मंगळसूत्राची रचना पूर्वीच्या राजघराण्यातील दागिन्यांच्या भव्यतेपासून आणि कारागिरितून प्रेरित आहे. (Rajwadi Mangalsutra Designs)

सध्याच्या फॅशनमध्ये पारंपारीक दागिन्यांमध्ये राजवाडी मंगळसूत्राचा ट्रेंड खूपच लोकप्रिय आहे. (Long Mangalsutra Patterns)

या मंगळसूत्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे भव्य आणि आकर्षक पेंडंट.

पेंडंटमध्ये अनेकदा पारंपारीक आकृतीबंद आणि जडणकाम केलेले असते. यात सुंदर कलाकुसर केलेली असते.

ही मंगळसूत्र प्रामुख्यानं सोन्यात बनवली जातात. पण सोन्याच्या दागिन्यांमध्ये मॅट किंवा गोल्ड फिनिश सध्या खूपच पसंतीस उतरत आहेत.

पेडंटमध्ये अनेकदा मोती, रंगीत खडे किंवा मीनाकारी काम वापरलेले असते. ज्यामुळे ते अधिक आकर्षक दिसतात.

राजवाडी मंगळसूत्रात काळ्या मण्यांची, जाड साखळी किंवा अधिक लांब असते जी सहसा चार ओळींची किंवा अधिक लांब असू शकते.

लग्नसमारंभ, पूजा किंवा पारंपारीक कार्यक्रमांसाठी हे मंगळसूत्र खूपच सुंदर दिसतात आणि पारंपारीक पोशाखांसोबत ते खास लूक देतात.

सोन्यासोबतच ही डिझाईन सध्या मायक्रो गोल्ड प्लेटेड किंवा वन ग्राम गोल्ड ज्वेलरीमध्येही उपलब्ध आहेत ज्यामुळे ते सर्वांना परवडते.

यात तुम्हाला हिरेजडीत पेडंटंही मिळतात ज्यामुळे सणासुधीला लूक अधिकच खुलून येतो.
















