प्रियांका चोप्राचा देसी नुस्का, 'या' पद्धतीने चेहऱ्याला कणिक लावा- दिसाल नेहमीच यंग आणि ब्यूटीफूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2026 15:01 IST2026-02-26T14:51:02+5:302026-02-26T15:01:38+5:30

देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि तिच्या आईने ग्लोईंग त्वचेसाठी एक अगदी सोपा घरगुती उपाय सुचविला आहे.(Priyanka Chopra's home made face mask for glowing skin)

हा उपाय प्रियांका आणि तिची आई या दोघीही जणी नेहमीच नियमितपणे करतात म्हणे (how to get young and glowing skin?). हा उपाय केल्याने त्वचेवरचं टॅनिंग, डेडस्किन कमी होऊन त्वचेला छान चमक येते.(home hacks for beautiful and young looking skin)

हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये २ चमचा गव्हाचे पीठ म्हणजेच कणिक घ्या.

त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस आणि चिमूटभर हळद घाला. हे दोन्ही घटक त्वचेच्या सौंदर्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात.

आता यामध्ये थेाडंसं दही घाला. दह्यामध्ये असणारे लॅक्टीक ॲसिड त्वचेला मऊ, मुलायम करतात.

आता या मिश्रणात थोडं गुलाब जल घाला. गुलाबजल त्वचेला छान हायड्रेशन देतं. आता हा लेप तुमच्या चेहऱ्याला लावा. त्यानंतर ५ ते ७ मिनिटांनी चेहरा हळुवारपणे चोळून लेप काढून टाका.

यानंतर चेहरा धुवून टाका आणि मॉईश्चायझर लावा. त्वचेवर खूप छान चमक दिसून येईल.