1 / 7काही जणांची त्वचा खूप सेन्सिटीव्ह असते. त्यामुळे उन्हापासून, थंडीपासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी त्यांना त्वचेची खूप काळजी घ्यावी लागते.2 / 7एवढंच नाही तर कोणतंही क्रिम, साबण, मॉईश्चरायजर, बॉडीलोशन, फेसमास्क, फेसपॅक लावतानाही पॅचटेस्ट घ्यावी लागते. कारण त्वचा खूप नाजूक असल्याने तिच्यावर कशाचा काय परिणाम होईल सांगताच येत नाही. 3 / 7अशा लोकांनी काही पदार्थ खातानाही थोडी काळजी घ्यायला हवी. कारण काही पदार्थ पौष्टिक असले तरी सेन्सिटीव्ह त्वचेसाठी त्रासदायक ठरू शकतात (people having sensitive skin should avoid 5 foods). ते पदार्थ नेमके कोणते याची डाॅक्टरांनी दिलेली माहिती ttalks.marathi या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.(food items should not be taken by people having sensitive skin)4 / 7त्यामध्ये त्यांनी सांगितलेला पहिला पदार्थ म्हणजे शेंगदाणा. ज्यांना त्वचेवर नेहमी खाज येते, पुरळ उठून त्वचा लालसर होते अशा लोकांनी शेंगदाणे कमी प्रमाणात खावे.5 / 7दुसरा पदार्थ आहे पोहे. ज्या लोकांना त्वचेचा कोणताही विकार असतो त्यांनी पोहे खाणं टाळायला हवं.6 / 7शेवग्याच्या शेंगा किंवा गवारच्या शेंगा खाण्याचा अतिरेकही टाळायला हवा. कारण या शेंगांमध्ये असणाऱ्या काही घटकांमुळे त्वचेला खाज येण्याचे प्रमाण वाढते आणि सेन्सिटीव्ह त्वचा असणाऱ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो.7 / 7ज्यांना ॲक्ने, पिंपल्स किंवा त्वचेवर पुरळ उठण्याचा त्रास असतो, अशा लोकांनी जास्त प्रमाणात गूळ खाणंही टाळायला हवं.