शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

३ गोष्टींकडे लक्ष द्या, पाळी आल्यानंतरही मुलींची उंची नक्कीच वाढते, मात्र त्यासाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2026 16:22 IST

1 / 6
मासिक पाळी सुरू झाल्यानंतर मुलींची उंची वाढत नाही, असं आपल्याकडे म्हटलं जातं. पण या गोष्टीत नेमकं किती तथ्य आहे ते पाहुया...
2 / 6
याविषयी बऱ्याच तज्ज्ञांनी अभ्यास केला असून त्यांचं हे मत आहे की मासिक पाळीनंतरही मुलींची उंची वाढू शकते, पण त्यासाठी मात्र काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
3 / 6
काही तज्ज्ञ असेही सांगतात की पाळी आल्यानंतर मुलींची उंची वाढते की नाही हे बऱ्याचदा अनुवंशिकतेवरही अवलंबून असते. म्हणजेच पालकांची उंची किती यावरही मुलींची उंची वाढेल की नाही किंवा किती वाढू शकेल हे ठरते.
4 / 6
दुसरी गोष्ट म्हणजे ९ ते १४ या वयोगटात मुलींची उंची झपाट्याने वाढते. त्यामुळे या दरम्यान पालकांनी त्यांच्या आहारावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. मुलींना सकस, पौष्टिक, ताजे आणि प्रोटीनयुक्त अन्न मिळेल याची काळजी घ्या.
5 / 6
मुलींना पुरेशी झोप मिळणं आणि त्यांनी तणाावमुक्त पद्धतीने जगणंही गरजेचं आहे. अभ्यासाचा, परीक्षेचा किंवा कोणत्याही गोष्टीचा ताण वाढला तर शांत झोप येत नाही. आणि ग्रोथ हार्मोन हा शांत झोपेमध्येच अधिक कार्यशील असतो. त्यामुळे मुलींचा स्क्रिनटाईम कमी करून त्यांच्या झोपेवरही लक्ष द्यावे.
6 / 6
तिसरी गोष्ट म्हणजे मैदानी खेळ खेळण्यास प्राधान्य द्यावे. पाळी सुरू झाल्यानंतर पुढचे एक ते दिड वर्ष त्यांची उंची वाढते. जर सायकलिंग किंवा इतर मैदानी खेळ भरपूर खेळले तर उंची जास्त वाढण्यास मदत होते. त्यामुळे इनडोअर ॲक्टीव्हिटी करण्यापेक्षा आऊटडोअर गेम खेळण्यावर भर द्यावा.
टॅग्स :Healthआरोग्यkidsलहान मुलंfoodअन्नExerciseव्यायाम