लग्नात उठून दिसेल शाही झुमका पैठणी; ९ सुंदर रंगात, आरी वर्कचं प्रिमियम ब्लाऊजही मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 14:07 IST2025-12-31T13:56:33+5:302025-12-31T14:07:17+5:30

New Jhumka Paithani Collection : यात प्रामुख्यानं बॉटल ग्रीन, राणी गुलाबी, मोरपंखी, वांगी आणि जांभळ्या रंगांना अधिक पसंती दिली जात आहे.

सध्या साड्यांच्या जगात झुमका पैठणी ही प्रचंड ट्रेंडींग आहे. पारंपारीक पैठणीला अधुनिक लूक दिल्यामुळे महिलांमध्ये या पैठणीची क्रेझ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. (Top Jhumka Paithani Designs)

या साडीच्या नावाप्रमाणेच याचा पदर आणि काठावर आकर्षक झुमका किंवा कर्णफुलांच्या डिझाईन्स विणलेल्या असतात.

यात प्रामुख्यानं बॉटल ग्रीन, राणी गुलाबी, मोरपंखी, वांगी आणि जांभळ्या रंगांना अधिक पसंती दिली जात आहे.

या साडीवर मोठे काठ आणि साडीभर लहान नाजूक बुट्ट्यांचे काम असते जे साडीला एक रिच लूक देते.

या साड्या सिल्क आणि सेमी सिल्क अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध आहेत. वजनाला हलक्या असल्यानं या साड्या नेसायला अतिशय सोप्या असतात.

पारंपारीक पैठणीचा तोचतोचपणा मोडून एक नवीन डिझायनर टच मिळाल्यामनं लग्नकार्यात आणि सणासुधीला याला मोठी मागणी आहे.

झुमका पैठणीची किंमत साडीच्या गुणवत्तेनुसार १२०० पासून ते ५००० रूपयांपर्यंत असते. आर्ट सिल्क स्वस्त दरात मिळतात तर अस्सल सिल्कच्या साड्या महाग असतात.

या साडीवर नथ आणि ठुशी घातल्यास साडीचा लूक अधिकच खुलून दिसतो.