Navratri 2025 : साबुदाणा खिचडी चिकट-कडक होते? ७ टिप्स, नवरात्रात करा मऊ परफेक्ट साबुदाणा खिचडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 17:59 IST2025-09-18T12:44:16+5:302025-09-18T17:59:04+5:30

How To Make Perfect Sabudana Khichdi : खिचडीसाठी दाण्याचं कुट जास्त बारीक करू नका. जाड कूट असेल तर खिचडी मऊ-मोकळी राहण्यास मदत होते.

आता नवरात्र (Navratri 2025) सुरूवात व्हायला काहीच दिवस बाकी आहे. नवरात्र (Navratri) म्हटलं की उपवास आलेच. उपवासाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात या नऊ दिवसांत बनवले जातात. साबुदाण्याची खिचडी उपवासाच्या फराळात आवर्जून केली जाते. खिचडी गोळा होते, चिकट होते किंवा साबुदाणे कडक राहतात अशी बऱ्याचजणांची तक्रार असते. (Sabudana Khichdi Making Tips)

मऊ, मोकळी साबुदाण्याची खिचडी करण्याच्या ट्रिक्स पाहू. साबुदाणा कमीत कमी दोन ते तीनवेळा स्वच्छ पाण्यानं धुवा. यामुळे त्यातल स्टार्च निघून जातं आणि खिचडी चिकट होत नाही.

साबुदाणा भिजवताना पाणी जास्त घालू नका. साबुदाणा फक्त पाण्यात बुडेल इतकंच घाला. तुम्ही एक वाटी साबुदाणा घेतला असेल तर त्यात अर्धी वाटी किंवा त्यापेक्षा कमी पाणी घाला.

साबुदाणा किमान ५ ते ६ तास भिजवून ठेवा किंवा रात्रभर शिजवा ज्यामुळे चांगला फुलतो आणि मऊ होतो.

खिचडीसाठी दाण्याचं कुट जास्त बारीक करू नका. जाड कूट असेल तर खिचडी मऊ-मोकळी राहण्यास मदत होते.

खिचडी करताना थोडं जास्त तेल किंवा तूप वापरा जेणेकरून खिचडी कढईला चिकटणार नाही.

चवीनुसार मीठ आणि साखर घालून साबुदाणे परतवून घ्या. यात तुम्ही चवीसाठी ओलं खोबरं किंवा काजू घालू शकता.

खिचडी तयार झाल्यानंतर त्यावर लिंबाचा रस पिळा. यामुळे खिचडी अधिकच चविष्ट, चवदार लागते.