National girl child day 2025 : ‘या’ ८ सुपरस्टार जोडप्यांसाठी त्यांची लेक म्हणजे काळजाचा तुकडा! तिच्यासाठी सारं काही..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2025 15:40 IST2025-01-24T14:02:32+5:302025-01-24T15:40:06+5:30

२४ जानेवारी १९६६ रोजी इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. भारताची लेक सर्वोच्च पदावर विराजमान होण्याची ती पहिलीच वेळ हाेती. त्यामुळे २४ जानेवारी हा दिवस भारतात सर्वत्र राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जात आहे.
पुर्वी मुलगी झाली की ती तिच्या कुटूंबाला ओझं वाटायची. आज त्या परिस्थितीत बऱ्याच प्रमाणात बदल झाला असून 'मेरी बेटी मेरा अभिमान', 'पेहेली बेटी धन की पेटी' असं म्हणण्यापर्यंत अनेक कुटूंबांचे विचार उंचावले आहेत. बॉलीवूड सेलिब्रिटीही त्याला अपवाद नाहीत.
आराध्या बच्चन ही ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची एकुलती एक लेक. त्यांना नेहमीच तिचं खूप कौतूक वाटतं.
सचिन आणि सुप्रिया पिळगावकर या दाम्पत्याची लेक म्हणजे श्रेया पिळगावकर. आज आई- बाबांच्या पावलांवर पाऊल ठेवून श्रेयाने तिची स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.
लेक राहा कपूरसाठी तिचा बाप रणबीर कपूर किती हळवा आहे हे आपल्याला माहितीच आहे. मुलीकडे लक्ष देता यावं म्हणून त्याने काही महिन्यांचा ब्रेकही घेतला होता. त्यावेळी त्यांचं भरभरून कौतूक झालं.
प्रियांका चोप्रा आणि नीक जोनास यांची कन्या म्हणजे मालती. तिला भारतीय संस्कार शिकवावे, भारतीय संस्कृतीनुसार ती वाढावी यासाठी प्रियांकाची नेहमीच धडपड सुरू असते.
बिपाशा बसूला सुद्धा मागच्यावर्षी कन्यारत्न झालं आणि मुलीच्या येण्याने तिचं घर आनंदून गेलं.
दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंग यांनाही काही महिन्यांपुर्वीच लेक झाली. एका मुलाखतीत रणवीरने सांगितलंच होतं की त्याला गोड मुलगी व्हावी असं वाटतं. त्याची इच्छा पुर्ण झाल्याने तो लेकीच्या जन्मानंतर वेगळ्याच आनंदात आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनाही इशा आणि अहाना या दोन लेकीच असून त्यांच्यासाठी त्या सर्वस्व आहेत..
अभिनेत्री श्री देवी या सुद्धा त्यांच्या दोन्ही मुलींच्या बाबतीत म्हणजेच जान्हवी आणि खुशीच्या बाबतीत अतिशय हळव्या होत्या. मुलींच्या देखभालीसाठी त्यांनी काही वर्षे स्वखुशीने करिअरलाही रामराम ठोकला होता.