शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

कितीही आवडत असले तरी उन्हाळ्यात 'हे ' पदार्थ जास्त खाऊ नका, पोटदुखीनं हैराण व्हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2026 09:35 IST

1 / 6
उन्हाळ्यात उष्णतेचा आधीच खूप त्रास होत असतो, त्यामुळे काही पदार्थ या दिवसात खाणं कटाक्षाने टाळायलाच हवं किंवा ते खायचेच असतील तर त्यांचं प्रमाण कमी ठेवायला हवं..(must avoid 5 foods in summer)
2 / 6
असे पदार्थ कोणते आहेत आणि त्यामुळे कोणता त्रास होऊ शकतो ते पाहूया..
3 / 6
सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे मिरचीचा ठेचा. अनेकांना रोजच्या जेवणात ठेचा हवाच असतो. पण उन्हाळ्यात मात्र लाल असो किंवा हिरव्या मिरचीचा असो ठेचा जास्त प्रमाणात खाणं टाळायला हवं. कारण मिरची उष्ण असते. त्यामुळे पित्त वाढण्याचा त्रास होतो. ॲसिडीटी होते.
4 / 6
लवंग, दालचिनी, काळे मिरे यासारखे पदार्थही उन्हाळ्यात कमी प्रमाणात खावेत. कारण त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो. खूप जास्त घाम येतो. त्यामुळे चक्कर येऊ शकते. याशिवाय हे पदार्थ उष्ण असल्याने शरीरात जळजळही होते.
5 / 6
उन्हाळ्यात आंबट, खारट हे पदार्थ हे जास्त प्रमाणात खाणं टाळायला हवं. कारण या पदार्थांमुळे शरीरात पाणी जास्त साठून राहते आणि त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास वाढतो.
6 / 6
भजी, वडे, सामोसे, कुरडया असे तळलेले पदार्थ या दिवसांत जास्त प्रमाणात खाऊ नये. त्यामुळेही डिहायड्रेशन होते. ॲसिडीटी होऊन थकवा येऊ शकतो. ही माहिती डॉक्टरांनी getfitwith_drchetana या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नSummer Specialसमर स्पेशल