लईच भारी! लग्नसराईसाठी मराळमोळ्या ज्वेलरीचे १० सुंदर सेट्स, सोहळ्यातला सुंदर साजश्रृंगार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 19:02 IST2025-11-04T11:51:58+5:302025-11-04T19:02:26+5:30
Maharashtrian Bridal Jewellery Set : सध्या बाजारात लग्नसराईसाठी खास ज्वेलरीचे कॉम्बो विकले जात आहेत.

लग्नात नववधूसाठी गोल्डन ज्वेलरीमध्ये पारंपारीक डिजाईन्सना बरीच मागणी आहे (Maharashtrian Bridal Jewellery Set). पारंपारीक नक्षीकाम केलेल्या डिजाईन्स बऱ्याच पसंत केल्या जातात. (Bridal Jewellery Set)

सध्या बाजारात लग्नसराईसाठी खास ज्वेलरीचे कॉम्बो विकले जात आहेत. यातील काही कॉम्बो ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत. (Marriage Jewellery Set For Wedding)

यासाठी तुम्हाला फार खर्च करावा लागणार नाही नाही. कमीत कमी बजेटमध्ये तुम्हाला अख्खा सेट मिळेल.

या सेट्समध्ये तुम्हाला एकाचवेळी ५ ते ६ प्रकारचे दागिने मिळणार आहेत. २००० ते ३५०० या किमतीत तुम्हाला उत्तम डिजाईन्सचे सेट्स मिळतील.

कोल्हापूरी साज हा पारंपारीक आणि अत्यंत महत्वाचा हारांचा प्रकार आहे. यात पानांच्या आकारात 21 किंवा 12 नक्षीदार सोन्याच्या घटकांची माळ असते. ज्यामध्ये काही शुभ चिन्ह असतात.

नववधूसाठी हा हार उत्तम पर्याय आहे. तुम्हाला साध्या कार्यक्रमांसाठी सुद्धा यातील एखादा दागिना घालता येईल. प्रत्येकाकडे असायला हवा असा हा सेट आहे.

यात तुम्हाला लाल, गुलाबी, हिरवा किंवा निळा हे 3 ते 4 रंग नक्की दिसतील. या रंगाचे स्टोन्स प्रत्येक साडीवर मॅच करतात. या पारंपारीक दागिन्यांमधले तीन रंग साडीचा लूक अधिकच आकर्षक बनवतात.

मोत्यांचा सेट सुद्धा नऊवारी साडीवर शोभून दिसतो. यात तुम्हाला ठुशी, लक्ष्मी हार, पेशवाई सेट असे बरेच पर्याय मिळतील.

जर तुम्हाला साधा सिंपल सेट हवा असेल तर हा सेट उत्तम आहे 200 रूपयांच्या आत तुम्हाला हा सेट मिळेल. (Images Credit- Mangalmurti Art Jewellery Instagram))

जर तुम्ही बनारसी साडी सिल्कची कोणतीही साडी नेसणार असाल तर दागिन्यांचा कॉम्बो उठून दिसेल. (All Image Credit-Jewellery Of World Instagram)

















