शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

मलायका अरोरा सांगते 'या' पद्धतीने खा कोरफडीचा ताजा गर, चेहऱ्यावरचं तेज कमी होणारच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2026 13:46 IST

1 / 6
बॉलीवूड स्टार मलायका अरोराचं वय पन्नाशीच्या पुढे गेलं आहे. पण तरीही या वयात तिचा फिटनेस, तिची चेहऱ्यावरची चमक तरुणींना लाजविणारी आहे.
2 / 6
मलायकाच्या फिटनेस आणि सौंदर्यामागचं कारण म्हणजे ती व्यायाम आणि आहार या दोन्ही गोष्टींबाबत अतिशय शिस्तबद्ध आहे. तिचं रुटीन काहीही असलं आणि ती कुठेही असली तरी या दोन गोष्टी ती सांभाळतेच.(Malaika Arora shared her aloe vera secret for glowing skin)
3 / 6
तिच्या सौंदर्यामागचं आणखी एक खास कारणंही तिने एका मुलाखतीत सांगितलं असून हा स्वस्तात मस्त उपाय तर जवळपास सगळ्यांनाच करता येण्यासारखा आहे.
4 / 6
मलायका सांगते की ती रोज सकाळी ताजी कोरफड तोडून आणते. त्यातला गर काढून तो ग्लासभर पाण्यात घालते आणि ते पाणी पिते. बाजारात खूप प्रकारचे कोरफडीचे गर, ज्यूस मिळतात. पण मलायका मात्र ते सगळं सोडून तिच्या घरातल्या कोरफडीचा गर खाण्यास प्राधान्य देते.
5 / 6
कोरफड त्वचेसाठी, केसांसाठी जशी चांगली असते तशीच ती अतिशय आरोग्यदायीही आहे. तिच्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, बी १२, ई आहे. तसेच त्यातून मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक आणि अमिनो ॲसिडही मिळतं.
6 / 6
कोरफडीमध्ये ॲण्टीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. पचनक्रिया सुधारण्यासाठीही ती उपयुक्त ठरते. खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित झालं तर साहजिकच त्याचा चांगला परिणाम आपल्या तब्येतीवर आणि चेहऱ्यावरही दिसून येतो.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजीHome remedyहोम रेमेडीmalaika aroraमलायका अरोरा