Mahashivratri 2026: महाशिवरात्र स्पेशल ८ सुंदर पांढऱ्या साड्या, साधेपणातलं सौंदर्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 11:03 IST2026-02-10T16:39:07+5:302026-02-11T11:03:17+5:30
Maha Shivratri 2026 Outfit Ideas Traditional Wear: पांढरा रंग नैसर्गिक सौंदर्याला अधिक खुलवतो.

महाशिवरात्रीच्या (Mahashivratri 2026) दिनाला पांढऱ्या रंगाच्या साड्या नेसण्याला विशेष महत्व दिले जाते. पांढरा रंग हा शांतता, पवित्रता आणि सात्विकतेचे प्रतीक मानला जातो. (8 Beautiful White Saree Designs For Mahashivratri)

पांढरा रंग नैसर्गिक सौंदर्याला अधिक खुलवतो. महाशिवरात्रीला पहाटे मंदिरात जाताना किंवा अभिषेक करताना पांढऱ्या साडीतील महिलांचे व्यक्तीमत्व अत्यंत सौम्य आणि प्रसन्न दिसते.

आजकाल पांढऱ्या साडीवर लाल, हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे काठ असलेली क्लासिक कॉम्बिनेशन्स खूप लोकप्रिय आहेत. यामुळे परंपरेसोबतच तुमचा फॅशन सेन्सही जपला जातो.

महादेवाला साधेपणा प्रिय असल्यामुळे या दिवशी पांढरा पेहराव करणं शुभ मानलं जातं. केवळ फॅशन म्हणून नाही तर श्रद्धेचा भाग म्हणून अनेक स्त्रिया या दिवशी पांढऱ्या रंगांची निवड करतात.

पांढरा रंग मन एकाग्र करण्यास मदत करतो. ज्यामुळे महाशिवरात्रीच्या उपासनेत आणि ध्यानात मन अधिक रमते.

महाशिवरात्रीच्या सुमारात हवामानात बदल होऊन उष्णता वाढू लागते अशावेळी पांढरी सुती साडी शरीराला गारवा देते.

तुम्ही या दिवशी पांढऱ्या रंगाची चिकनकारी, लिनन कॉटन किंवा काठापदराची साडी नेसून एक मोहक लूक मिळवू शकता.

पांढऱ्या साडीवर रुद्राक्षांच्या माळा किंवा चांदीचे दागिने अत्यंत उठून दिसतात आणि पारंपारीक लूक पूर्ण करतात.

















