1 / 8आपल घर सुंदर असावं असं प्रत्येकाला वाटतं. पण कधीकधी बजेटअभावी तर कधी वेळेअभावी आपण घराच्या सजावटीकडे दुर्लक्ष करतो. सोशल मीडियावर आलिशान घरांचे फोटो पाहून आपल्याला वाटतं की आपलं घर असं कधी दिसेल? पण घरात असणाऱ्या काही वस्तू व्यवस्थित ठेवल्या तर त्याच्या दिसण्याला महत्त्व असतं. (home decor ideas for living room)2 / 8बऱ्याचदा आपण घरात नको असलेल्या वस्तूंचा ढीग साठवून ठेवतो किंवा चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास घर निस्तेज दिसतं. जर आपल्याला लिव्हिंग रुमचा चेहरा बदलायचा असेल, तर महागड्या सोफा सेटची किंवा परदेशी शो-पीसची गरज नाही. फक्त १००० रुपयांच्या आत आपण अशा काही गोष्टी करु शकतो, ज्यामुळे आपल्या घराला रिच आणि क्लासी लूक मिळेल. पाहूया काही सोप्या ट्रिक्स. (Minimalist home decor for small apartments)3 / 8जुन्या सोफ्याला नवा लूक देण्यासाठी ब्राइट आणि कॉन्ट्रास्ट रंगाचे कुशन कव्हर्स वापरा. आपल्याला ३०० ते ४०० रुपयांत ५ कुशन कव्हर्सचा सेट मिळेल. सिल्क किंवा वेलवेट टच असलेले कव्हर्स घराला रॉयल लूक देतात. 4 / 8नॅचरल ग्रीनरी घराला जिवंतपणा आणि फ्रेशनेस आणण्यास मदत करते. यासाठी आपण घरात इनडोअर प्लांट्स लावू शकतो. १०० ते १५० रुपयांत स्नेक प्लांट, मनी प्लांट किंवा झेड प्लांट आणा. हे घरातील कोपऱ्यात ठेवल्यास खोली सुंदर दिसते. 5 / 8घरात फक्त पांढरे बल्ब किंवा ट्यूबलाईट असेल तर घर साधे वाटते. २०० ते ३०० रुपयांत मिळणारे वॉर्म व्हाईट फोकस लॅम्प्स किंवा फेअरी लाईट्स कोपऱ्यात किंवा झाडांच्या मागे लावा. यामुळे रात्रीच्या वेळी खोलीला छान लूक मिळतो. 6 / 8मोठा आरसा लावल्याने छोटी खोली सुद्धा मोठी आणि लक्झरी वाटते. त्याचा प्रकाश परावर्तित केल्याने घर उजळते. जुन्या आरशाला गोल्डन स्प्रे पेंट द्या, किंवा स्वत:च्या हाताने साधी पेटिंग काळ्या फ्रेममध्ये लावून भिंतीवर लावा. 7 / 8घरातील नको असलेल्या वस्तू काढून टाका. यामुळे जागा मोकळी होते. १००- २०० रुपयांचे सेंटेड कॅन्डल्स किंवा डिफ्यूझर वापरा. घरातून छान सुवास आला की आपोआपच ५ स्टार हॉटेलसारखी फिलिंग येते. 8 / 8हॉलमध्ये आपण रिकाम्या भिंतीवर एखादी छान फोटो फ्रेमही लावू शकतो. यामुळे भिंतीला लूक मिळतो.