शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

चपात्या खूप शिल्लक राहिल्या ? वाया न जाता करा ८ पदार्थ - चवीला भारी, मुलंही मागून खातील...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2026 16:00 IST

1 / 10
बरेचदा रात्रीच्या जेवणात किंवा दुपारी चपात्या जास्तीच्या केल्या जातात आणि त्या शिल्लक राहतात. दुसऱ्या दिवशी त्या शिळ्या चपात्या खायला कुणीच तयार होत नाही, मग घरच्या गृहिणीला प्रश्न पडतो की या उरलेल्या चपात्यांचं नेमकं करायचं काय? शेवटी नाईलाजास्तव त्या फेकून द्याव्या लागतात किंवा वाया जातात. पण आता टेन्शन घेऊ नका! या शिल्लक राहिलेल्या चपात्या वाया न घालवता, आपण त्यापासून अतिशय चटपटीत आणि इन्स्टंट पदार्थ तयार करू शकतो(Indian leftover food recipes).
2 / 10
हे पदार्थ करायला अतिशय सोपे असतात आणि झटपट होतात, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खायला आवडतील... शिळ्या चपात्यां वाया न घालवता नाश्त्या किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी काहीतरी 'हटके' पदार्थ अगदी झटपट तयार करु शकता. हे पदार्थ केवळ चविष्टच नसतात तर वेळही वाचवतात आणि घरच्यांना काहीतरी नवीन खायला मिळतं. शिळ्या चपात्यांपासून चटपटीत, टेस्टी आणि झटपट तयार होणारे पदार्थ कोणते ते पाहूयात...
3 / 10
शिल्लक राहिलेल्या चपात्या मिक्सरमध्ये हलकेच फिरवून बारीक चुरा करा. मग तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता, कांदा, मिरची, शेंगदाणे यांची फोडणी तयार करा. हळद, मीठ, चपातीचा चुरा मिक्स करून वाफ काढा. कोथिंबीर, लिंबू पिळा. फोडणीची चपाती खाण्यासाठी तयार.
4 / 10
चपातीचे लांब पातळ काप करा. तेलात हाय फ्लेमवर भाज्या (कांदा, सिमला, कोबी, गाजर) परता. चवीनुसार सोया सॉस, शेजवान चटणी, केचप आणि चपातीचे काप घालून टॉस करा.
5 / 10
तव्यावर चपाती तूप लावून कुरकुरीत करा. पिझ्झा सॉस/केचप लावा. आवडीनुसार भरपूर भाज्या आणि वरून चीज किसून घाला. झाकण ठेवून चीज विरघळेपर्यंत गरम करा.
6 / 10
उरलेल्या चपात्यांचे तुकडे करून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. एका कढईत थोडे तूप गरम करून त्यात हे चपातीचे मिश्रण, किसलेला गूळ आणि वेलची पूड घाला. गूळ वितळेपर्यंत आणि मिश्रण एकजीव होईपर्यंत परता. मिश्रण थोडे कोमट असतानाच त्याचे छोटे-छोटे लाडू वळून घ्या. हे लाडू चवीला अतिशय अप्रतिम लागतात.
7 / 10
पोळीचे त्रिकोणी तुकडे करा. ते तेलात तळा किंवा एअर फ्रायर करा. वरून चाट मसाला, लाल तिखट भुरभुरा.
8 / 10
तवा गरम करून तूप घाला, पोळी ठेवा. वर सॉस, कांदा, काकडी, चाट मसाला, बारीक शेव घालून दोन्ही बाजूंनी दुमडा.
9 / 10
पनीर, सिमला मिरची, पत्ताकोबी, कांदा, टोमॅटो, मसाले, सॉस परतून घ्या. पोळीला बटर, सॉस लावून सारण भरा व रोल करा.
10 / 10
उरलेल्या चपात्या तव्यावर पसरवून कडक झाल्यावर तेलात खरपूस तळा. तुकड्यांवर कांदा, टोमॅटो, शेव टाकून नाचोससारखे खा.
टॅग्स :foodअन्नRecipeपाककृतीCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.