शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

कंगना रणौतचे ८ साडी लूक; साध्या साडीमध्येही दिसते स्टायलिश-प्रोफेशनल आणि अत्यंत सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 11:51 IST

1 / 8
खासदार म्हणून कंगना रणौतची संसदेतील उपस्थिती केवळ तिच्या भाषणांमुळेचे नाही तर तिच्या पार्लमेंटरी फॅशनमुळेही चर्चेत असते. तिनं साडी नेसण्याच्या पारंपारीक पद्धतीला एक अधुनिक आणि प्रोफेशनल टच दिला आहे. तिच्या साड्यांबाबतची काही महत्वाची वैशिष्ट्यै पाहूया. (Kangana Ranaut's 8 Saree Looks Idea)
2 / 8
कंगना प्रामुख्यानं कॉटन, सिल्क, खादी आणि चंदेरी अशा अस्सल भारतीय हातभाग साड्यांना पसंती देते. (Kangana Ranaut's 8 Saree Looks)
3 / 8
तिच्या संग्रहात बिहारची मधुबनी, ओडीशाची कोटपाड, आसामची मुगा सिल्क, बंगालची कांथा वर्क अशा विविध प्रादेशीक कलाकुसर असलेल्या साड्या पाहायला मिळतात.
4 / 8
हिवाळ्याच्या काळात तिनं साडीवर ट्रेंच कोट, लांब ओव्हरकोट किंवा ब्लेझर घालून साडीला एक पॉवर ड्रेसिंग लूक दिला.
5 / 8
ती अनेकदा पांढरा, पेस्टल कलर्स, राखाडी आणि गडद निळा अशा साध्या पण उठावदार रंगाच्या साड्या निवडते. ज्या अधिक प्रोफेशनल वाटतात.
6 / 8
पारंपारीक ब्लाऊजऐवजी ती कधी शर्ट, कधी हाय नेक स्वेटर तर कधी बोट नेट ब्लाऊज वापरते.
7 / 8
तिच्या लूकला पूर्ण करण्यासाठी ती मोत्यांची माळ, साधी बिंदी आणि क्लासिक सनग्लासेसचा वापर करते.
8 / 8
साडीवर केवळ हिल्स न घालता ती अनेकदा लोफर्स किंवा बुट्स घालून एक धाडसी आणि आरामदायी स्टाईल कॅरी करते. तिची साडी नेसण्याची पद्धत अत्यंत व्यवस्थित असते. ज्यामुळे त्यात राजेशाही थाट आणि शिस्त दिसून येते.
टॅग्स :ShoppingखरेदीfashionफॅशनKangana Ranautकंगना राणौत