खरखरीत झालेले तळहात-तळपाय ५ मिनिटांत होतील मऊ मुलायम, चमचाभर मीठ घेऊन करा 'हा' उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2026 13:07 IST2026-03-11T13:00:14+5:302026-03-11T13:07:35+5:30

कधी कधी असं लक्षात येतं की आपले तळपाय आणि तळहात खूपच खरखरीत झालेले आहेत...

त्यांच्यावरची डेडस्किन, टॅनिंग वाढल्याने ते काळवंडूनही गेले आहेत. दरवेळी पार्लरमध्ये जाऊन महागडं पेडिक्युअर आणि मेनिक्युअर करणंही शक्य नसतं.

अशावेळी पुढे सांगितलेला एक अगदी सोपा उपाय करून पाहा.. हा उपाय केल्यामुळे अगदी ५ मिनिटांत आणि कमीतकमी पैशांत तुमचे हात आणि पाय अगदी स्वच्छ होऊ शकतात.

हा उपाय करण्यासाठी तुमच्या हातावर अर्धा ते एक चमचा तुमचं नेहमीचं मॉईश्चरायजर घ्या.

जेवढं मॉईश्चरायजर घेतलं असेल तेवढंच त्यात मीठ घाला. आता मीठ आणि मॉईश्चराजर एकत्र करून तुमच्या हातांवर, पायांवर एक ते दिड मिनिट चांगलं चोळा. चोळत असताना त्वचेचं चांगलं स्क्रबिंग झालं पाहिजे एवढा जोर लावावा.

त्यानंतर साबण न वापरता साध्या पाण्याने हात- पाय धुवून घ्या आणि टॉवेलने पुसून स्वच्छ करा...

बघा तुम्हाला हातापायांत खूप छान फरक जाणवेल. टॅनिंग, डेडस्किन कमी झालेलं दिसेल आणि त्वचेवर छान मऊपणा, चमक येईल.

















