नव्या नवरीसाठी सुंदर स्टायलिश ८ जोडवी, कमी वजन पण दिसतात ठसठशीत, पाहा डिझाईन्स..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2026 15:43 IST2026-02-13T15:32:15+5:302026-02-13T15:43:20+5:30

लग्नासाठी नव्या नवरीला जोडवी घ्यायची असतील तर बाजारात सध्या खूप नवनवे प्रकार मिळत आहेत...

अशा पद्धतीची काही जोडवी खूपच वेगळं डिझाईन असणारी आहेत. त्यामुळे महिलांकडून या जोडव्यांना खूप प्रतिसाद मिळत आहे.

हल्ली चांदीही खूप महागली आहे. त्यामुळे कमी वजनाच्या चांदीत ठसठशीत दिसणाऱ्या जोडव्यांचे प्रकारही मिळत आहेत.

अशी सुंदर आणि वेगळ्या धाटणीची जोडवी पायात असतील तर नव्या नवरीचे पाय आणखी जास्त शोभून दिसतात.

असा एकच खडा आणि ऑक्सिडाईज चांदी या प्रकारातही तुम्ही जोडवी घेऊ शकता.

रोज वापरण्यासाठी नाजुक जोडवी घ्यायची असतील तर असे काही सुंदर डिझाईन्स मिळतात.

थोडी फंक्शनल लूक देणारी जोडवी घ्यायची असतील असे मस्त डिझाईन्स नक्कीच खुलून दिसतात.

हा एक आणखी छान प्रकार पाहा. हे डिझाईन तर एवढं देखणं आहे की बघताक्षणीच कोणालाही घ्यावं वाटेल.

















