IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 17:25 IST2025-10-09T17:08:45+5:302025-10-09T17:25:32+5:30
IAS Ambika Raina : अंबिका रैना यांनी दोन अयशस्वी प्रयत्नांनंतर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. तिसऱ्या प्रयत्नात त्याचं स्वप्न अखेर साकार झालं.

जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथील रहिवासी अंबिका रैना या आयएएस अधिकारी आहेत. अपयशानंतर खचून न जाता त्यांनी मेहनतीने मोठं यश मिळवलं आहे.
अंबिका यांनी यूपीएससी २०२२ च्या परीक्षेत १६४ वा रँक मिळवला, तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवलं. अडचणी असूनही ध्येय साध्य करता येतं हे त्यांच्या कारकिर्दीतून दिसून येतं.
स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अंबिका यांचं हे घवघवीत यश प्रेरणादायी आहे. अपयशानंतरही यश मिळतं हे त्यांनी दाखवून दिलं आहे.
अंबिका रैना यांनी दोन अयशस्वी प्रयत्नांनंतर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. तिसऱ्या प्रयत्नात त्यांचं स्वप्न अखेर साकार झालं.
ज्यूरिख कंपनीत इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना स्वित्झर्लंडमध्ये नोकरीची ऑफर मिळाली. पण त्यांनी ती सोडून स्वप्न पूर्ण करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.
अंबिका सुरुवातीपासूनच नागरी सेवेसाठी वचनबद्ध होत्या. म्हणूनच त्यांनी भारतात येऊन तयारीसाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याचा निर्णय घेतला.
दोनदा अपयशी झाल्यानंतर, तिसऱ्या प्रयत्नात १६४ वा रँक मिळवला. मुलाखतीची तयारी करण्यासाठी १०० हून अधिक मॉक इंटरव्ह्यू पाहिले. त्यानंतर रणनीती आखली.
आज इंटरनेट हा ज्ञानाचा खजिना आहे; त्याचा सुज्ञपणे वापर करणं अत्यंत महत्वाचं आहे असं म्हणत अंबिका यांनी विद्यार्थ्यांना शक्य तितके जुने पेपर आणि मॉक टेस्ट सोडवण्याचा सल्ला दिला.