महिलांनी रोज एक खजूर खाणं अत्यंत फायद्याचं! थकवा होईल कमी, पाळीही येईल वेळेवर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2025 15:47 IST2025-03-28T15:38:25+5:302025-03-28T15:47:24+5:30

It is extremely beneficial for women to eat one date every day : रोज एक खजूर खाणे महिलांसाठी फार उपयुक्त ठरेल. पाहा किती फायदे आहेत.

सुदृढ राहण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे असते. महिला स्वत:च्या आरोग्याकडे फार दुर्लक्ष करतात. त्यामुळे थकवा तसेच चिडचिड होते.

घाईगडबडीमध्ये बाकी काही करता आले नाही तरी, साधे उपाय तर नक्कीच करता येतात. जसे की शरीरासाठी गरजेचे असे पदार्थ खाणे. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत जेवणे.

तसेच काही पदार्थ आहेत ते रोज खाल्याने अनेक फायदे मिळतात. मग एखादे फळ असेल. सॅलेड असेल. इतरही गोष्टी असतात. खजूर रोज खाणे महिलांसाठी फायदेशीर ठरते.

रोज सकाळी एक खजूर खायचा. जास्त नाही फक्त एक कारण खजूर उष्ण असतो. तसेच महिलांच्या शरीरामध्ये उष्णता जास्त असते. पित्त किंवा इतर त्रास होऊ नयेत म्हणून एकच खायचा.

खजूरामुळे पाळीच्या वेळाही सुरळीत होतात. अनेक महिलांची पाळी वेळेवर येत नाही. आठवडाभरही पुढे मागे होते. त्यांना पीसीओडीचाही त्रास नसतो तरीही वेळा चुकतात. अशा महिलांसाठी रोज एक खजूर खाणे अगदीच उत्तम ठरेल.

पचनासाठी खजूर चांगला असतो. त्यामध्ये फायबर असते. पोट साफ होत नसेल किंवा गॅसेसचा त्रास असेल तो ही कमी होईल. पचनसंस्था सुरळीत काम करेल.

महिलांमध्ये हाडे खिळखिळी होणे तसेच झीजणे ही समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. खजूर हाडांना मजबुती देण्यासाठी फायदेशीर आहे. कारण खजूरामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम तसेच फॉस्फरस असते.

खजूर शक्ती वर्धक असतो. खजूर खाल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. सकाळी एक खजूर खाल्ला की तो दिवसभरासाठीची ऊर्जा तयार करू शकतो. मात्र दिवसभरात आहारही चांगला घ्यावा.

खजूरामध्ये भरपूर आयर्न असते. त्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. रक्ताची कमतरता असणार्‍यांनी तर रोज दोन खजूर खायलाही हरकत नाही.

खजूर चवीला गोड असतो. तसेच त्यामध्ये प्रोटीन असते. इतरही अनेक घटक असतात. त्यामुळे क्रेव्हींग्ज कमी करून पोट भरण्यासाठी खजूर उत्तम आहे. गोड खाण्याची आवड असणार्‍यांसाठी खजूर चांगला.

कोलेस्ट्रॉलचे शरीरातील प्रमाण योग्य राखण्यासाठी खजूर उपयोगी ठरतो. जर कोलस्ट्रॉल खुपच वाढले असेल तर ते कमी करण्यासाठी खजूर खाऊ शकता.

खजूरामध्ये पोटॅशिअम असते. रक्तदाबाच्या समस्या असतील तर पोटॅशिअमची कमतरता असू शकते. खजूरात पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे ब्लड प्रेशरवर नियंत्रण ठेवण्यासाठी खजूर फायदेशीर असतो.