महागडी साडी घरीच कशी धुवावी? बघा सोपी ट्रिक- साडीची चमक वर्षांनुवर्षे टिकून राहील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2025 09:35 IST2025-11-16T09:34:12+5:302025-11-16T09:35:01+5:30

आपल्याकडच्या महागड्या साड्या घरीच धुण्याची आपली हिंमत होत नाही. कारण त्या साड्या खराब होतील अशी भीती वाटते.

पण त्या साड्या वारंवार ड्रायक्लिनला टाकणंही शक्य नसतं. म्हणूनच महागाची साडी घरीच कशी धुता येईल, याची ही ट्रिक एकदा पाहून घ्या..

हा उपाय mh13_loundry_wala यांनी शेअर केला आहे. त्यासाठी ते सांगतात की सगळ्यात आधी स्वच्छ पाण्यात साडी १० ते १५ मिनिटे भिजवून ठेवा.

त्यानंतर एका टबमध्ये ५ ते ६ लीटर पाणी घ्या. त्यामध्ये बाजारात मिळणारं सिल्क वॉश लिक्विड घालून पाण्यात व्यवस्थित मिसळून घ्या.

त्यानंतर ते पाणी साडी ज्या टबमध्ये भिजवली आहे त्यात घाला. आता या पाण्यात साडी चांगली खळबळून घ्या. तिला कुठेही घासू, रगडू नका. जर साडीचा रंग जात असेल तर ती लगेच पाण्यातून काढून घ्या. जर रंग जात नसेल तर साडी १० ते १५ मिनिटे पाण्यात राहू द्या.

त्यानंतर साडी पाण्यातून बाहेर काढा. हलक्या हाताने पिळून घ्या आणि सावलीमध्ये वाळत टाका.

तुमच्याकडे सिल्क वॉश लिक्विड नसेल तर एखादा माईल्ड शाम्पू वापरूनही सिल्कची साडी धुता येते.