नाकावरचे ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स ५ मिनिटांत हाेतील गायब, लगेच करा १ सोपा घरगुती उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2025 14:49 IST2025-11-26T14:43:28+5:302025-11-26T14:49:23+5:30

नाकावर ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स वाढले की चेहरा खूपच विद्रुप दिसायला लागतो. काळवंडलेलं नाक अजिबातच चांगलं दिसत नाही.

नाकाप्रमाणेच हनुवटी, ओठांच्या दोन्ही कोपऱ्यांजवळची त्वचा याठिकाणीही काही जणांना व्हाईट हेड्स असतात. ते कमी करण्यासाठी पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहा.

हा उपाय करण्यापुर्वी चेहऱ्याला ५ ते ७ मिनिटे वाफ द्या. यामुळे व्हाईटहेड्स, ब्लॅकहेड्स लवकर निघण्यास मदत होतात.

त्यानंतर एका वाटीमध्ये १ चमचा तांदळाचं पीठ घ्या. त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळा.

यानंतर त्यामध्ये अर्धा ते एक चमचा टुथपेस्ट टाका. सगळं मिश्रण हलवून घ्या आणि ते नाकाला लावा.

एखाद्या मिनिटानंतर चोळून चोळून काढून टाका. चेहरा धुतल्यानंतर ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स बऱ्याच प्रमाणात निघून गेलेले दिसतील.

आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्सचा त्रास होणारच नाही.