शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

दहीवडा कडक होतो? ५ टिप्स, मऊ लुसलुशीत- तोंडात टाकताच विरघळणाऱ्या दहीवड्यांचे पाहा परफेक्ट प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2025 20:50 IST

1 / 7
अनेकदा हॉटेलमध्ये किंवा चार्ट कॉर्नरवर दही वडा आवडीने खाल्ला जातो. पण या पदार्थाची चव चाखण्यासाठी अनेक महिला घरी दही वडा ट्राय करतात. बरेचदा प्रमाण चुकतं किंवा वडा खाताना घास लागतो, पदार्थ फसतो. अशावेळी टाकून देण्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय नसतो. (Soft Dahi Vada recipe)
2 / 7
वडा बनवताना तो मऊ आणि स्पंजी होत नाही. तर पीठात गुठळ्या देखील तयार होतात. जर आपल्यालाही घरी दही वडा बनवायचा असेल तर या ५ टिप्स लक्षात ठेवा. वडे कापसासारखे मुऊ होतील.(Dahi Vada tips)
3 / 7
वडा बनवताना तो सॉफ्ट आणि स्पंजी हवा असेल तर पीठ चांगले फेटून घ्या. जितके जास्त पीठ फेटाल तितका जास्त वडा सॉफ्ट होईल. अनेकदा पीठ इतके जास्त कडक होते की, तेलात टाकताना हातातून सुटत नाही.
4 / 7
वडा तळल्यानंतर तो लगेच ताटात काढून ठेवा. ताटात टिश्यू पेपर ठेवा, ज्यामुळे त्यातील अतिरिक्त तेल निघेल आणि वडा नरम पडणार नाही.
5 / 7
वडा तेलात टाकण्यापूर्वी हाताला पाणी लावा. ज्यामुळे तो हाततून सहज तेलात जाईल. अनेकदा पीठ हाताला चिकटून राहते. तसेच यामुळे वड्याचा आकारही नीट येईल.
6 / 7
तेलात वडा टाकताना मंद आच असू द्या. तेलात वडा टाकल्यानंतर गॅसची फ्लेम फास्ट करा, ज्यामुळे वडा व्यवस्थित फुगेल.
7 / 7
वडा तळल्यानंतर लगेच पाण्यात घालणार असाल तर पाणी एकदम थंड असायला हवे. नाहीतर वडा कडक होईल. सॉफ्ट आणि स्पंजी दही वडा तयार करण्यासाठी या सोप्या टिप्स वापरा.
टॅग्स :foodअन्नRecipeपाककृतीkitchen tipsकिचन टिप्स