घरातलं फर्निचर जुनाट दिसू लागलं? 'हा' पदार्थ लावून पुसा- नव्यासारखं लखलख चमकेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2026 16:10 IST2026-02-26T16:04:22+5:302026-02-26T16:10:26+5:30

घरातलं फर्निचर खराब, जुनाट दिसत असेल, त्याच्यावरची चमक कमी झाल्यासारखी जाणवत असेल तर पुढे सांगितलेला एक उपाय करून फर्निचर पुसून काढा..(how to make old furniture clean and shiny?)

हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये २ ते ३ चमचे मोहरीचं तेल घ्या.(simple tips and tricks to maintain the shine of furniture)

त्यामध्ये १ टीस्पून बेकिंग सोडा आणि १ टीस्पून कोणताही शाम्पू घाला. सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून घ्या आणि याने फर्निचर पुसा.

त्यानंतर लगेच एखाद्या सुती कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्या. फर्निचरवर छान चमक आलेली दिसेल.

१ चमचा ऑलिव्ह ऑईल आणि अर्धा कप पाणी हे मिश्रण एकत्र करून त्याने फर्निचर पुसा. ते छान चमकदार दिसेल.

२ चमचे मोहरीचं तेल आणि अर्धा कप पाणी हे मिश्रणही फर्निचरला चमकदार करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं. यापैकी जो उपाय तुम्हाला सोपा वाटेल तो करून फर्निचर स्वच्छ करून पाहा.