वर्षांनुवर्षे जुने पिगमेंटेशन ३० दिवसांत होतील गायब, लावा पपईचा 'हा' फेसमास्क, त्वचा होईल नितळ- स्वच्छ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2026 16:45 IST2026-03-28T16:39:17+5:302026-03-28T16:45:38+5:30

साधारण पस्तिशी ओलांडली की बऱ्याच जणींच्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन दिसू लागतात. त्वचेवर आलेल्या या काळ्या डागांमुळे चेहरा खराब दिसू लागतो.(how to get rid of pigmentation and dark spots?)

हे पिगमेंटेशन कमी करण्यासाठी काही साधे- सोपे घरगुती उपायही आहेत. त्यापैकीच एक आहे पपईच्या सालींचा उपाय...

हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा याप्रमाणे काही दिवस नियमितपणे केल्यास पिगमेंटेशन कमी होण्यास नक्कीच मदत होईल. त्यासाठी पपईची सालं घ्या.

ती उन्हामध्ये कडक वाळवा आणि नंतर मिक्सरधून फिरवून त्यांची पावडर करून घ्या. त्या पावडरमध्ये १ चमचा ॲलोव्हेरा जेल घाला.

त्यानंतर त्यामध्ये १ चमचा गुलाबजल घाला. आता हा लेप चेहऱ्याला लावा. १० ते १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून टाका. काही दिवस नियमितपणे हा उपाय करा. महिनाभरात पिगमेंटेशन नक्कीच कमी झालेलं जाणवेल.

दुसरा उपाय करण्यासाठी पपईची पानंही वापरता येतील. यासाठी पपईची पानं मिक्सरमधून फिरवून घ्या आणि त्यांचा रस गाळून घ्या.

आता या रसामध्ये थोडं तांदळाचं पीठ आणि बेसन घालून त्याचा लेप करा. हा लेप चेहऱ्याला लावा आणि १५ मिनिटांनी चोळून तो काढून टाका.

यामुळे डेडस्किन, टॅनिंग जाऊन त्वचेवर छान चमक आलेली दिसेल. ट्राय करून पाहा.

















