प्रेशर कुकरवर तेलाचे-मसाल्याचे डाग साचलेत? एक सोपी ट्रिक, मिनिटांत होईल स्वच्छ-दिसेल नव्यासारखा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2025 19:05 IST2025-05-12T19:00:00+5:302025-05-12T19:05:01+5:30

How to clean pressure cooker stains: Remove oil stains from cooker: Easy way to clean cooker stains: अनेकदा प्रेशर कुकरमध्ये भाजी किंवा मसाल्याचे डाग चिकटून राहतात. आपण काही घरगुती उपाय केले तर तो साफ होऊन पुन्हा नव्यासारखा चमकेल.

आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात प्रेशर कुकर असतो. ज्याचा वापर भाजी, वरण-भात किंवा पदार्थांची उकड काढण्यासाठी केला जातो. परंतु अनेकदा प्रेशर कुकरमध्ये भाजी किंवा मसाल्याचे डाग चिकटून राहतात. (How to clean pressure cooker stains)

यामुळे प्रेशर कुकरवरील हट्टी डाग- काळेपणा सहसा निघत नाही. अशावेळी आपण काही घरगुती उपाय केले तर तो साफ होऊन पुन्हा नव्यासारखा चमकेल. (Remove oil stains from cooker)

प्रेशर कुकर साफ करण्यासाठी त्यात पाणी भरुन उकळवा. यानंतर पाणी थंड करा आणि त्यात डिशवॉश लिक्विडचे काही थेंब घाला. स्क्रबरच्या मदतीने प्रेशर कुकर साफ करा.

प्रेशर कुकरमध्ये पाणी भरुन त्यात लिंबाचा रस मिसळा आणि नंतर ते पाणी उकळवा. प्रेशर कुकर थंड झाल्यानंतर स्क्रबरच्या मदतीने स्वच्छ करा. डाग निघून जाण्यास मदत होईल.

कुकर साफ करण्यासाठी आपण कांद्याच्या सालीचा वापर करु शकतो. यासाठी कुकरमध्ये पाणी आणि कांद्याची साले टाकून ते उकळवा. नंतर पाणी काढून टाका आणि स्क्रबरच्या मदतीने स्वच्छ करा.

बेकिंग सोडा मिसळून प्रेशर कुकर साफ करता येतो. यासाठी आपल्याला पाण्यात बेकिंग सोडा मिसळवून ते पाणी उकळायला हवे. पाणी उकळल्यानंतर फेकून द्या आणि स्क्रबरने कुकर स्वच्छ करा.

अर्धा कप व्हिनेगर कुकरमधल्या पाण्यात घालून रात्रभर तसेच ठेवा. सकाळी कुकरमध्ये डिशवॉश घालून स्क्रबरने घासा. कुकर अगदी नव्यासारखा चमकेल.