1 / 7दिवाळी येण्यापूर्वीच आपण घरातील कानाकोपरा स्वच्छ करतो. पण यावेळी देवघर आणि त्यात असणाऱ्या तांब्या-पितळेच्या मूर्तींकडे सहज दुर्लक्ष केले जाते. देवघरात असणाऱ्या मूर्ती जर मार्बल, पितळेच्या किंवा चांदीच्या असल्या तर त्यावर काळे डाग पडतात, घाण साचते. पण अनेकदा आपण वरच्यावर साफ करुन ठेवतो. (Diwali idol cleaning hacks)2 / 7पितळेच्या मूर्ती ह्या लगेच काळ्या पडतात, ज्यामुळे त्यांची चमकही जाते. अशावेळी नेमक काय करावं आपल्याला सुचत नाही. पण काही घरगुती उपाय केल्यास मूर्ती लगेच साफ होतील आणि जास्त घासण्याची गरजही लागणार नाही. (home cleaning for Diwali) 3 / 7पितळेच्या मूर्ती साफ करण्यासाठी आपण लिंबू आणि मिठाच्या मिश्रणाचा उपाय करु शकतो. दोन्ही घटक एकत्र करुन यांने ब्रशच्या सहाय्याने घासा. नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. 4 / 7चांदीची मूर्ती लगेच काळी पडते. साफ करण्यासाठी आपण टूथपेस्टचा वापर करु शकतो. ब्रशच्या मदतीने थोडा टूथपेस्ट मुर्तीवर घासा. नंतर कोमट पाण्याने मुर्ती स्वच्छ करा. मूर्ती खूप काळी झाली असेल तर बेकिंग सोडा आणि पाण्याच्या मदतीने पेस्ट तयार करुन घासा. काळपटपणा दूर होईल. 5 / 7मूर्ती साफ करण्यासाठी आपण बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वापर देखील करु शकतो. याचा वापर केल्यास मूर्ती अगदी नव्यासारखी चमकेल. 6 / 7मार्बलची मूर्ती साफ करण्यासाठी कोणतेही केमिकल्स वापरु नका. यासाठी कोमट पाण्यात डिशवॉश लिक्विड घालून मूर्ती साफ करा. 7 / 7अनेकदा आपल्या देवघरात खूप महागड्या किंवा रंगीत मूर्ती असतात. ज्यांचा रंग जाण्याची शक्यता असते. अशा मूर्तीला मऊ सुती कापडाने स्वच्छ करा. काचेच्या मूर्तींना ओल्या कापडाने पुसा. ज्यामुळे दिवाळीत घरासह आपलं देवघर सुद्धा चमकेल.