शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

रात्री झोपण्यापूर्वी करा ५ सोप्या गोष्टी, सकाळी मिळेल चमकदार त्वचा-महागड्या लोशन्सपेक्षा भारी उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2025 19:06 IST

1 / 7
हिवाळ्यात वातावरणातील गारठ्यामुळे आपली त्वचा कोरडी, निस्तेज आणि निर्जीव दिसू लागते. थंड वाऱ्यामुळे त्वचेला भेगा पडतात, त्वचा सुरकुतलेली दिसते आणि विशेषतः चेहऱ्याची त्वचा फुटून (homemade face masks for dry skin) पांढरी पडू लागते. या ऋतूमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी महागड्या मॉइश्चरायझरचा वापर करण्याऐवजी, आपल्या स्वयंपाकघरातील काही सामान्य आणि नैसर्गिक पदार्थ वापरून आपण त्वचेची ही फुटलेली आणि खराब झालेली त्वचा सहजपणे दुरुस्त करू शकतो.
2 / 7
घरातीलच नैसर्गिक पदार्थांचा वापर करून तयार केलेले काही घरगुती फेसमास्क त्वचेला पुन्हा नैसर्गिक तेज, ओलावा आणि मुलायमपणा देऊ शकतात, हे घरगुती फेसमास्क कसे तयार करायचे ते पाहूयात...
3 / 7
डॉक्टर सलीम जैदी सांगतात की, दुधामध्ये नैसर्गिक फॅट, आणि प्रोटीन असतात, जे त्वचेत खोलवर जाऊन तिला पोषण देतात. यासोबतच, दुधामध्ये असलेले लॅक्टीक ॲसिड त्वचेच्या मृत पेशी काढून टाकते. तर, मध त्वचेला नैसर्गिक ओलावा देते, जे त्वचेतील ओलावा वाढवते. १ प्रत्येकी १ टेबलस्पून फुल क्रीम दूध आणि मध घ्या. दोन्ही एकत्र करून चेहऱ्यावर आणि हात-पायांवर लावा. १५ मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून टाका. हिवाळ्यात रोज रात्री झोपण्यापूर्वी हा मास्क लावू शकता.
4 / 7
खोबरेल तेल एक उत्कृष्ट नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. त्यामध्ये असलेले फॅटी ॲसिड त्वचेवर एक पातळ थर तयार करतात, ज्यामुळे ओलावा त्वचेत टिकून राहतो. हलके गरम केलेले कोल्ड-प्रेस्ड खोबरेल तेल आंघोळ झाल्यावर संपूर्ण शरीरावर लावा आणि हलका मसाज करा. तसेच आपण रात्रभर देखील त्वचेवर तसेच लावून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हलक्या कोमट पाण्याने आंघोळ करा. याचबरोबर, आपण खोबरेल तेल आणि ग्लिसरीन सम प्रमाणांत एकत्रित करून त्यांचा देखील फेसमास्क तयार करून त्वचेवर लावू शकतो.
5 / 7
अतिशय कोरड्या आणि संवेदनशील त्वचेसाठी हा सर्वात उत्तम उपाय आहे. २ टेबलस्पून ताजा कोरफडीचा गर आणि १ टेबलस्पून ग्लिसरीन घ्या. हे दोन्ही एकत्र मिसळून चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. २० मिनिटांनंतर ते धुवून टाका. हा उपाय तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी करू शकता.
6 / 7
दुधावरची साय हिवाळ्यात त्वचेसाठी नैसर्गिक मॉइश्चर म्हणून वापरली जाऊ शकते. ही त्वचेला मऊ करते आणि फाटलेले ओठ देखील ठीक करते. ताजी साय चेहऱ्यावर लावून ५ मिनिटे मसाज करा आणि १० मिनिटांनी चेहरा धुऊन टाका. रात्री ओठांवर साय लावून झोपा. यामुळे सकाळपर्यंतच ओठ मऊ - मुलायम होतात.
7 / 7
केळ आणि मधाचा फेसमास्क हिवाळ्यातही त्वचेल झटपट चमक ग्लो आणि हायड्रेशन देतो. अर्धे पिकलेले केळ मॅश करा आणि त्यात १ टेबलस्पून मध मिसळून चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी चेहरा धुवून टाका. हा उपाय तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा करु शकता.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजीHome remedyहोम रेमेडीAyurvedic Home Remediesघरगुती उपायWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजी