शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भरपूर कॅल्शियम देणाऱ्या पदार्थांची ही घ्या यादी, हाडं ठणठणीत- थकवाही होईल दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2023 5:18 PM

1 / 7
कॅल्शियम हे एक असे खनिज आहे जे आपली हाडं मजबूत करण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. महिला सतत कामं करत असतात त्यामुळे त्यांच्या शरीरात तर कॅल्शियम योग्य प्रमाणात असायलाच हवे.
2 / 7
बदाम हा कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. तसेच हा मोनोअसॅचराइडस आणि प्रोटीनचाही उत्तम स्त्रोत आहे. याबरोबरच पालक, बटाटा, खजूर, अक्रोडही खायला हवे.
3 / 7
दूध, दही, पनीर, ताक हे महिलांसाठी अतिशय उपयुक्त कॅल्शियम स्त्रोत आहेत. हाडांची मजबूती वाढवण्यासाठी त्यांचा चांगला उपयोग होतो.
4 / 7
ब्रोकोली आपण फारशी खात नाही पण कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत असलेली ही भाजी खायला हवी. व्हिटॅमिन के, सी आणि फायबर यांचे भरपूर प्रमाण असलेली ही भाजी आरोग्यासाठी फायदेशीर असते.
5 / 7
तीळातही कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. आपण साधारणपणे थंडीच्या दिवसांत तीळ खातो. पण एरवीही ठराविक प्रमाणात तीळ खाल्ले तरी चालू शकते. आरोग्य उत्तम राहण्यासाठी आणि हाडांच्या बळकटीसाठी तीळ खाणे फायदेशीर असते.
6 / 7
मसूर डाळ आपण आहारात फारशी वापरत नाही. पण रोजच्या स्वयंपाकात मसूर डाळीचा अवश्य वापर करावा, त्यामुळे चांगल्या प्रमाणात कॅल्शियम मिळण्यास मदत होते.
7 / 7
हे वेस्टर्न पदार्थ मानले जातात त्यामुळे आपल्याकडे ते जास्त प्रमाणात खाल्ले जात नाहीत. मात्र टोफू आणि मशरुम हेही कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहेत.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planआहार योजनाLifestyleलाइफस्टाइल