मुहुर्ताला सोनं खरेदीची हौस? पाहा स्वस्तात मस्त पर्याय, खिशाला परवडणाऱ्या १ ग्रॅम सोन्यात घ्या 'हे' नाजुक दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2026 15:47 IST2026-03-18T15:39:04+5:302026-03-18T15:47:37+5:30

सध्या सोन्याचे भाव किती वाढले आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे. पण तरीही काही जणांना साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणाऱ्या गुढी पाडव्याच्या दिवशी (Gudhi Padva 2026) सोनं खरेदी करण्याची खूप इच्छा होते.

काही जणांचं मत असंही असतं की महाग असलं तरी सोनं घ्यायचंच. कारण ते कायम तेजीतच राहातं. त्यामुळे त्यात नुकसान होण्याची शक्यता खूप कमी असते आणि सोनं खरेदीच्या निमित्ताने थोडा पैसा बाजुला पडून बचतही होते.

त्यामुळे यंदा तुम्हालाही गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर थोडं का असेना पण सोनं घ्यायचं असेल आणि एखादा नाजुक दागिना घ्यायचा असेल तर पुढे दिलेले काही पर्याय पाहा..

तुम्ही छानशी नथ घेऊ शकता. १ ग्रॅम वजनात मोत्याची नथ येऊ शकते. शिवाय त्यामध्ये आता कित्येक नवनवे प्रकारही आलेले आहेतच.

तुम्हाला मोरणी घालायला आवडत असेल तर पाडव्याच्या निमित्ताने छान नाजुक मोरणी घ्या. १ ग्रॅमपेक्षाही कमी सोन्यात छान ठसठशीत मोरणी येऊ शकते.

तिसरा पर्याय म्हणजे अंगठी. हल्ली १ ते दिड ग्रॅम सोन्यात बसणाऱ्या कमी वजनाच्या अंगठ्यांचे कित्येक नवनवे प्रकार बाजारात आलेले आहेत.

बुगडी हा देखील एक चांगला पर्याय आहे. सणवार, लग्नकार्य असलं की अशा बुगड्या कानात खूप उठून दिसतात.

याशिवाय आणखी एक पर्याय म्हणजे नाजुक कानातले. डेली वेअरसाठी नाजुक कानातले छान वाटतात. शिवाय कमी वजनात बसतात आणि त्यानिमित्ताने सोन्याचा दागिना खरेदी करण्याची हौसही भागविता येते.