शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Female bodybuilder : 'या' आहेत भारतातल्या प्रसिद्ध ५ महिला बॉडी बिल्डर्स; यांचा फिटनेस अन् सुंदरतेपुढे हिरोईन्सही पडतील फिक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 6:13 PM

1 / 9
भारतात पुर्वापारपासून कुस्तीचा आणि शरीर सौष्ठवाबद्दल आकर्षण आहे. गामा पैहलवान, दारा सिंह यांसारख्या अनेक पैलवानांनी भारताचं नाव जगभरात उज्ज्वल केलं आहे. बदल्या काळात कुस्तीचे स्वरूपही बदलले आहे. सुरूवातीला तिथे मल्ल असायचे तिथे आता बॉडी बिल्डींग दिसून येतेय.
2 / 9
सुरूवातीला फक्त पुरूषचं कुस्तीच्या क्षेत्रात होते. आज महिलासुद्धा बॉडी बिल्डींग क्षेत्रात पुढे गेल्या आहेत. या लेखात तुम्हाला प्रसिद्ध महिला बॉडी बिल्डर्सबद्दल सांगणार आहोत.
3 / 9
याश्मीन चौहान भारताली टॉप फिमेल बॉडी बिल्डर्सपैकी एक आहे. ४० वर्षीय याश्मीन गुडगावची रहिवासी असून ती सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. आयएफबीबी प्रो कार्ड जिंकलेल्या याश्मीननं २०१८ मध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं. याव्यतिरिक्त तिनं बॉडी बिल्डींगमध्येही मेडल मिळवलं आहे. याश्मीननं एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की, ती पुरूषांप्रमाणे दिसते म्हणून लोक खूप टोमणे मारायचे. पण नेहमीच तिनं लोक काय म्हणतात याकडे दुर्लक्ष देऊन आपलं काम, करिअर आणि मेहनतवर लक्ष दिलं. याश्मीन आज अनेक हाय प्रोफाईल क्लाईंट आणि सेलिब्रिटींना ट्रेनिंग देते.
4 / 9
दक्षिण भारतातील रहिवासी सोनाली स्वामी इंटरनॅशनल फिटनेस एथलीट आहे. ती प्रोफेशनल बॉडी बिल्डर असून फिटनेस कोचसुद्धा आहे. सोनाली डांसची खूप शौकीन असून ती एक प्रोफेशनल डान्सर पण आहे.
5 / 9
सोनाली स्वामी एशियन चॅम्पियनशिप २०१६ बॉडी पॉवर इंडिया, मसलमेनिया इंडिया २०१४ सारख्या कॉम्पि२टिशन्समध्ये मेडल जिंकलेली आहे. ती एक गृहिणी असून करियर आणि फॅमिलीतील समतोल ठेवत तिनं ही सफलता मिळवली आहे.
6 / 9
श्र्वेता मेहता फिटनेस मॉडल आणि इंडियन बॉडी बिल्डर आहे. ती क्लासिक आणि वुमन फिटनेस मॉडल सारख्या स्पर्धासुद्धा जिंकली आहे. श्वेता रोडीज सिजन १५ ची विनरसुद्दा होती.
7 / 9
२०१९ च्या दुर्घटनेत श्वेताची मान फॅक्टर झाली. तिच्या स्पायनल कॉर्डची ३ हाडं तुटली. अनेक महिने बेड रेस्ट केल्यानंतरही तिनं हार मानली नाही आणि आधीसारखा फिटनेस मिळवला.
8 / 9
उत्तरप्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यातील रहिवासी अंकीता सिंह हिने शाळेत असतानाच एरोबिक्स क्लास जॉईन केला होते. यामुळे तिचा फिटनेसकडे कल अधिक वाढला. कॉलेजच्या दिवसात प्रेमभंग झाल्यानंतर तिनं जीमला जायला सुरूवात केली होती.
9 / 9
दीपिका चौधरी प्रोफेशनल एथलीट असून बॉडी बिल्डर आणि पॉवर लिफ्टरसुद्धा आहे. ती सध्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी पुण्यात टेक्निकल ऑफिसर आहे. दीपिका चौधरी भारताची पहिली महिला IFBB प्रो विनर आहे. तिला आपली बॉडी टोन करण्यासाठी २ वर्ष लागली.
टॅग्स :Womenमहिलाwomens healthस्त्रियांचे आरोग्यbodybuildingशरीरसौष्ठव