Simple Diwali Rangoli Designs : रांगोळी काढता येत नाही? पाच मिनिटांत काढायला शिका सुंदर डिझाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2025 16:08 IST2025-10-17T15:43:47+5:302025-10-17T16:08:49+5:30

New Rangoli Designs for Diwali 2025, easy rangoli designs: Can't draw rangoli? Learn to draw beautiful designs in five minutes : रांगोळी काढता येत नसेल तर पाहा काय करावे.

रांगोळी काढता येणे ही एक कलाच आहे. सगळ्यांनाच रांगोळी काढता येते असे नाही. पण अनेक ट्रिक्स आणि डिझाइन्स आहेत जे रांगोळी काढता न येणाऱ्यांनाही काढता येतील.

असे डिझाइन्स नक्की पाहा. सगळ्यांनाच काढायला जमतील आणि दिसतातही सुंदर. रंगीत असे हे डिझाइन यंदा दिवाळीसाठी नक्की दारापाशी काढा.

चमच्याच्या मदतीने ही अशी रांगोळी काढता येते.

अगदी सोपी अशी पणती दिवाळीत काढायला हवीच. खडूच्या मदतीने काढा आणि रंग भरा.

असे फुल काढणे अगदीच सोपे आहे. रांगोळीचे गोळे तयार करुन चमच्याच्या मदतीने रांगोळी काढा.

खडूच्या मदतीने वेल काढून घ्या. सोपी फुले काढून रंग भरा.

हे डिझाइन तर अगदीच सोपे आहे. नक्की काढून पाहा.

स्वस्तिक असलेली रांगोळी दाराशी काढा. सुंदर दिसेल.