दसरा स्पेशल: फक्त झेंडूची फुलं आणि आंब्याची पानं घेऊन काढा सुंदर रांगाेळी, ७ सोप्या डिझाईन्स..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2025 16:24 IST2025-09-29T16:17:41+5:302025-09-29T16:24:33+5:30

दसऱ्याच्या आसपास झेंडूची फुलं बाजारात मोठ्या प्रमाणात आलेले असतात. त्यामुळे त्यांचा वापर करून खूप छान रांगोळी काढता येऊ शकते.

झेंडूची फुलं आणि आंब्याची पानं फक्त एवढंच साहित्य वापरून एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स काढता येतात.

तुमच्या घरासमोरची जागा लहान असो किंवा मोठी असो तुम्हाला हवी तशी ही रांगोळी लहान- मोठी करता येते.

झेंडूच्या फुलांच्या माळा आणि आंब्याच्या पानांची अशी माळ हे दोन वापरूनही मस्त डिझाईन्स तयार करता येतात.

अशा पद्धतीने झेंडूची फुलं आणि आंब्याची पानं मांडली तर मध्यभागी तुम्ही मोठा दिवा किंवा समई ठेवू शकता.

या सगळ्याच रांगोळ्या काढायला अतिशय सोप्या आहेत. शिवाय त्या काढायला जास्त वेळही लागत नाही.

अगदी १० ते १२ मिनिटांत तुम्ही सुंदर रांगोळ्या काढू शकता.

घरामध्येही एखाद्या कॉर्नरमध्ये सजावट करून ठेवायची असल्यास या रांगोळ्या परफेक्ट आहेत.