1 / 7पावसाळ्यात जागोजागी मक्याच्या गाड्या उभ्या दिसतात. निखार्यावर परतलेला मका खाण्यात मज्जाच काही और आहे. मात्र मक्याच्या दाण्याचे चाटही अगदी छान लागते. 2 / 7मात्र हा पदार्थ फार महाग विकला जातो. त्यामुळे विकत घेण्यापेक्षा घरीच मक्याच्या उकडलेल्या दाण्याचे पाच प्रकारचे चाट आरामात तयार करा. चवीला विकतपेक्षा मस्त. 3 / 7मक्याचे दाणे पौष्टिक असतात. जर तुम्ही डाएट करत असाल तर हे दाणे खाणे नक्कीच फायद्याचे ठरेल. खास डाएट करणाऱ्यांसाठी मक्याचे दाणे, काकडी, चाट मसाला, टोमॅटो, कांदा आणि उकडलेले काबुली चणे असे चाट करता येते. थोडे लाल तिखट घालायचे. मूग मटकीही घालू शकता. 4 / 7अगदी साधी रेसिपी करायची असेल तर मक्याचे दाणे बटरवर मस्त परतून घ्यायचे. त्यात लाल तिखट घालायचे कांदा घालायचा. कोथिंबीर घालायची आणि छान खमंग परतलेले चविष्ट असे चाट खायचे. फक्त बटर आणि तिखट असेल तरी मस्त लागते. 5 / 7अनेक कॅफेजमध्ये मिळणारे कॉर्न चाट चवीला जरा वेगळे लागते कारणे ते मैदा लावून तळलेले असते. मक्याचे दाणे मैद्या मिक्स करुन कुरकुरीत तळायचे बाकी आवडीच्या भाज्या आणि मसाले घालायचे आणि वरती चीज किसायचे. 6 / 7ज्यांना तिखट खायला आवडते त्यांच्यासाठी शेजवान चाट अगदी मस्त आहे. शेजवान चटणी मध्ये दाणे मस्त मिक्स करायचे आणि मग त्यात इतरही काही पदार्थ घालायचे. तसेच चीज घालू शकता. बटरही छान लागते. जास्त तिखट नको असेल तर लिंबाचा रस पिळायचा. 7 / 7विविध फळांचेही कॉर्न चाट करता येते. त्यासाठी केळी, संत्री, मोसंबी, सफरचंद अशी फळे वापरता येतात. त्यात चाट मसाला घालायचा आणि उकडलेले मक्याचे दाणे घालायचे. पावसाळ्यात खाण्यासाठी अगदी छान पौष्टिक पदार्थ आहे.