शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मासिक पाळीत खूप वेदना होतात ? आहारात करा ६ पदार्थांचा समावेश, मिळेल आराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2022 5:35 PM

1 / 8
महिलांना महिन्यातील ४ दिवस प्रचंड वेदनेत घालवावे लागतात. मासिक पाळीच्या दरम्यान महिलांना पोटदुखी, डोकेदुखी, अंगदुखी, कंबरेत दुखणे, मूडमध्ये वारंवार बदल असे अनेक प्रकार घडतात. मासिक पाळीची तारीख जर पुढे गेली असेल आणि अचानक मासिक पाळी आली की प्रचंड वेदना होतात. बदललेली जीवनशैली यासह वेळेवर जेवण न केल्यामुळे आपल्या शरीराला गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. बऱ्याच महिला या वेदनेपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक औषधांचे सेवन करतात. मात्र, या औषधांचा दुष्परिणाम होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. आपण घरगुती फळ भाज्यांचे सेवन करून देखील मासिक पाळीच्या वेदनेपासून आराम मिळवू शकता.
2 / 8
मेडिकल न्यूज टुडेच्या वेबसाईटनुसार स्पेन येथील विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या एका अभ्यासात असे आढळून आले की, ''शाकाहारी आहार यासह फळे भाज्या खाल्ल्याने मासिक पाळीच्या वेदना कमी होण्यास मदत होते. फळे आणि भाज्या हे आहारातील पोषक आणि फायबरचे महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे, ते विशेषतः मासिक पाळीच्या वेळी उपयुक्त ठरू शकतात.''
3 / 8
मासिक पाळीच्या दरम्यान, आपल्याला हिरव्या भाज्या जास्त खावे असा सल्ला दिला जातो. मासिक पाळीत अधिक रक्तस्त्राव झाल्याने शरीरात आयरनची कमतरता भासते. त्यामुळे मासिक पाळीच्या दरम्यान, हिरव्या भाज्या अधिक प्रमाणावर खावे.
4 / 8
मासिक पाळीतील वेदना कमी करण्यासाठी कॅल्शियमयुक्त आहार उपयुक्त ठरू शकतो. याने कंबर दुखणे यासह अंगदुखीपासून आराम मिळेल. फक्त मासिक पाळीतच नाही तर इतर दिवशीही आपण कॅल्शियमयुक्त आहाराचे सेवन केले पाहिजे.
5 / 8
मासिक पाळीच्यावेळी, पोटात गॅसची समस्या उद्भवणे सामान्य बाब आहे. मात्र, या कारणामुळे पोटदुखी अधिक प्रमाणावर होते. अशा परिस्थितीत आपण ओव्याचे सेवन करू शकता. ओवा, मीठ आणि गरम पाण्याचे सेवन एकत्र करावे. याने पोटदुखीची समस्या कमी होते.
6 / 8
आलं आपल्या शरीरासाठी किफायीतशीर आहे. आल्यातील पौष्टीक गुणधर्म शरीराला उर्जा देतात. आपण आल्याचे सेवन चहा अथवा भाज्यातून करू शकता.
7 / 8
मासिक पाळीच्या दरम्यान, पपई खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपल्या आहारात पपईचा समावेश करू शकता. पपई खाल्ल्याने पोटाला काहीसा आराम मिळतो आणि वेदना देखील होत नाही.
8 / 8
डार्क चॉकलेटमध्ये फायबर आणि मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक असते. मासिक पाळीत वेदना कमी करण्यासाठी डार्क चॉकलेट प्रभावी ठरू शकतात. यासह मूड स्थिर ठेवण्यास देखील मदत करेल
टॅग्स :Menstrual Healthमासिक पाळी आणि आरोग्यWomenमहिलाHealth Tipsहेल्थ टिप्सHome remedyहोम रेमेडीfruitsफळेvegetableभाज्या