लहान मुलांना चुकूनही देऊ नका प्लास्टिक डबा आणि बाटली - आरोग्यासाठी ठरेल फार धोक्याचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2025 09:17 IST2025-09-14T09:09:09+5:302025-09-14T09:17:49+5:30
Do not give plastic containers and bottles to children, very dangerous to health : प्लास्टिक वापरणे आरोग्यासाठी फार घातक. लहान मुलांना डबे देणे टाळा.

आपल्याला अनेकदा प्लास्टिकचे डबे आणि बाटल्या वापरणे सोयीस्कर वाटते, पण प्लास्टिकचे डबे किंवा बाटली वापरणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. त्याचा आरोग्यावर फार वाईट परिणाम होऊ शकतो.
प्लास्टिकच्या डब्यात गरम पदार्थ ठेवल्यास उष्ण पदार्थांचे आणि रसायनांचे मिश्रण होऊ शकते. जे शरीरात गेल्यावर हार्मोनल असंतुलन व पचनासंबंधी समस्या निर्माण करू शकतात.
दीर्घकाळ प्लास्टिकच्या डब्यात पाणी किंवा जेवण ठेवले तर त्यातील हानिकारक घटक हळूहळू पदार्थात मिसळतात आणि त्यामुळे मूत्रपिंड व यकृतावर ताण येऊ शकतो.
सूर्यप्रकाशात किंवा उष्णतेत ठेवलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी गरम होऊन रासायनिक बदल होतो, ज्यामुळे ते पाणी प्यायल्याने आरोग्यासाठी धोक्याचे ठरु शकते.
मुलांच्या आरोग्यासाठी प्लास्टिक अत्यंत धोकादायक असते. लहान मुलांना प्लास्टिकच्या बाटल्या, डबे किंवा खेळणी देऊ नयेत कारण त्यांचे शरीर विषारी घटक सहन करण्यासाठी तयार नसते आणि अधिक संवेदनशील असते.
प्लास्टिकच्या अति वापरामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते, त्यामुळे लहान-सहान आजार वारंवार होण्याची शक्यता वाढते.
पर्यावरणासाठीही प्लास्टिक चांगले नाही. तर आपल्या आरोग्यासाठी कसे असेल? डबे आणि बाटल्या विघटन न होता वर्षानुवर्षे पडून राहतात आणि माती व पाणी दोन्ही दूषित करतात.
त्यामुळे स्टील, काचेचे किंवा मातीचे डबे व बाटल्या वापरणे अधिक सुरक्षित आणि टिकाऊ ठरते आरोग्याचं रक्षण होतं आणि पर्यावरणालाही फायदा होतो. प्लास्टिक वापरणे टाळायचे म्हणजे फक्त पिशव्याच नाही तर डबे व बाटल्याही टाळा.